आयपीएल 2021

‘सीमोल्लंघना‘च्या आयपीएलची दसऱ्याला सांगता?

नवा दिल्ली - भारताच्या सीमा ओलांडून अमिरातीत उलटलेला फड रंगणाऱ्या आयपीएलचा कार्यक्रम आता जवळपास निश्चित होत आहे. १५ सप्टेंबरचा मुहूर्त असून १५ ऑक्टोबरला अंतिम सामना होणार आहे, त्याच दिवशी सर्वत्र दसरा साजरा केला जाणार आहे.  आयपीएल अमिरातीत घेण्यावरून बीसीसीआय आणि अमिराती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नुकतीच बैठक झाली. गतवेळेप्रमाणे दुबई, अबुधाबी आणि शारजा येथे सामने होतील, यावरही या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.  दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगला...

क्रिकेट

कसोटीचे भवितव्य आता पुढच्या दोन दिवसांवर

साऊदम्टन - कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात चौथा दिवस अपेक्षेप्रमाणे पावसामुळे पूर्ण वाया गेला. त्यामुळे आता पुढील दोन दिवसांतील खेळावर सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या दोन दिवसांत पाऊस नसेल, उद्या ढगाळ वातावरण तर, बुधवारी सूर्यप्रकाश असेल. हा अंतिम सामना निकाली ठरवण्यासाठी आयसीसीने राखीव दिवसाची सोय केली होती. या दिवसाचा उपयोग होणार हे निश्चित आहे. सामन्याचा पहिला दिवस अगोदरच पूर्णपणे वाया गेलेला आहे. आयसीसीच्या या महत्त्वाकांक्षी सामन्यात आतापर्यंत दोन दिवसांचा खेळ झालेला आहे...

टेनिस

विम्बल्डन, ऑलिंपिकमधून राफेल नदालची माघार

माद्रिद - जागतिक क्रमवारीत तिसरा असलेल्या राफेल नदालने विम्बल्डन टेनिस स्पर्धा, तसेच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. वीस ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकलेल्या नदालने दोनदा विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे. विम्बल्डन, तसेच ऑलिंपिक माघारीचा निर्णय नक्कीच सोपा नव्हता. पण शरीराची हाक ऐकण्याचे ठरवले. त्याबाबत माझ्या टीमसह चर्चा केली. टेनिस कारकीर्द लांबवणे हे माझे प्रमुख लक्ष्य आहे. त्यासाठीचा हा निर्णय घेतला आहे, असे नदालने सांगितले. सर्वोच्च स्तरावर सर्वोत्तम खेळ करणे हे माझे कायम लक्ष्य आहे. त्या स्पर्धात...

फुटबॉल

पोलंडविरुद्धच्या बरोबरीमुळे स्पेनला साखळीत बाद होण्याचा धोका

सेविले (स्पेन) - सदोष नेमबाजीचा फटका स्पेनला पुन्हा बसला. पेनल्टी किकही दवडलेल्या स्पेनला युरो फुटबॉल स्पर्धेतील पोलंडविरुद्धच्या लढतीत १-१ बरोबरी स्वीकारावी लागली. यामुळे ते साखळीत बाद होण्याचा धोका आहे. अल्वारो मोराता याने २५ व्या मिनिटास स्पेनला आघाडीवर नेले. पूर्वार्धात चेंडू दोनदा गोलपोस्टवर लागून परतलेल्या पोलंडने हार मानली नव्हती. रॉबर्टो लेवांडोवस्कीने ५४ व्या मिनिटास बरोबरी साधून दिली. गेरार्डो मॉरेना याने घेतलेल्या पेनल्टी किकवर चेंडू गोलपोस्टवर लागून परतला. रिबाऊंडवर मोराताची किक बाहेर गेली. त्यामुळे...

बॅडमिंटन

मरीन नसली म्हणजे स्पर्धा सोपी नव्हे; सिंधूचे प्रतिपादन

नवी दिल्ली - कॅरोलिन मरीन नसली म्हणजे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा माझ्यासाठी सोपी झाली असे मी समजण्याचा प्रश्नच येत नाही. जगातील अव्वल १० खेळाडूंचा दर्जा जवळपास सारखाच आहे, असे जागतिक विजेत्या पी व्ही सिंधूने सांगितले. डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे मरीन ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेस मुकणार आहे. रिओमध्ये सिंधू अंतिम फेरीत मरीनविरुद्ध हरली होती. याकडे लक्ष वेधल्यावर सिंधू म्हणाली, महिला एकेरीत अव्वल १० खेळाडू एकमेकींच्या तोडीच्या आहेत. एखादी नसेल, तर स्पर्धा सोपी होत नाही. स्पर्धेत तई झू यिंग, रॅचनॉक इनतॅनॉन, नोझोमी...

लोकल स्पोर्ट्स

T-10 Cricket : छोट्याशा गावातील रिझवान करणार महाराष्ट्राचे नेतृत्व

जळगाव जिल्ह्यातील छोट्याशा गावातील खेळाडू टी-10 क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करताना पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र टी-10 असोसिएशनने नुकतीच महाराष्ट्राच्या संघाची घोषणा केली. यात महाराष्ट्र संघाच्या नेतृत्वाची धूरा ही जळगाव जिल्ह्यातील पाचोरा गावच्या रिझवान पठाणकडे देण्यात आली आहे. 4 एप्रिलपासून टी-10 स्पर्धेचे सामने दिल्ली आणि ग्रेटर नोएडाच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत.   दिल्ली येथील टी 10 असोसिएशनतर्फे उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतील पंधरा सामने हे डे...

इतर स्पोर्ट्स

जागतिक कुस्तीसाठी कोल्हापूरच्या नेहाची निवड

मुंबई - जागतिक कॅडेट कुस्ती निवड चाचणीत सुवर्णपदक जिंकत कोल्हापूरच्या नेहा चौगुलने भारतीय संघात स्थान मिळवले. किरण पाटीलनेही भारतीय संघात स्थान मिळवले आहे. कोल्हापूरमधील मुरगुडे येथील क्रीडा प्राधिकरणाच्या कुस्ती संकुलात सराव करणाऱ्या नेहाने ४९ किलोखालील गटात विजेतेपद जिंकले. तिने पंजाबच्या मनप्रीतला १०-० तसेच आंतरराष्ट्रीय पदक विजेती आरती (हरियाणा) हिला ४-२ असे पराजित करीत भारतीय संघातील स्थान निश्चित केले.