चॅम्पियन्स लीग : गोल धडाक्‍यात बायर्नची सरशी? पीएसजीविरुद्ध रंगणार अंतिम सामना 

संजय घारपुरे
Saturday, 22 August 2020

व्यावसायिक फुटबॉलच्या मोसमात बायर्न म्युनिचचा बुलडोझकर पीएसजीचा संघ चॅम्पियन्स लीगमध्ये कसा रोखणार यावरच स्पर्धेतील विजेतेपदाचा निर्णय होईल.

लिस्बन : व्यावसायिक फुटबॉलच्या मोसमात बायर्न म्युनिचचा बुलडोझकर पीएसजीचा संघ चॅम्पियन्स लीगमध्ये कसा रोखणार यावरच स्पर्धेतील विजेतेपदाचा निर्णय होईल. प्रतिस्पर्धी संघाचा भर आक्रमणावर आहे, तसेच त्यांच्याकडे गोल करू शकतील असे खेळाडू आहेत, त्यामुळे अंतिम सामन्यात गोलांचा धडाकाच अपेक्षित आहे. 

धोनीच्या निवृत्तीनंतर न्यूज चॅनलने लावला भलत्याच 'युवराज सिंग'ला फोन; VIDEO VIRAL  

पाच वेळा विजेते असलेल्या बायर्नने 2013 नंतर प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यापूर्वी त्यांना सलग चार उपांत्य लढतीत हार पत्करावी लागली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी पीएसजी प्रथमच विजेतेपदाची लढत खेळणार आहेत. त्यांना प्रथमच आपण युरोपिय फुटबॉलमध्येही सर्वोत्तम संघ आहोत हे दाखवण्याची संधी आहे. 

पोर्तुगालमधील लिस्बन येथील एस्टाडियो दे लुझ स्टेडियमवर ही लढत होईल. हे स्टेडियम बेनफिकाचे होम ग्राऊंड आहे. त्यांच्या चाहत्यात किती उत्साह आहे हे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नसल्याने समजणार नाही. मात्र फ्रान्स (पीएसजी) आणि जर्मनीव्यतिरीक्त (बायर्न म्युनिच) या सामन्याबाबत मोठ्या प्रमाणावर नक्कीच औत्सुक्‍य आहे. 

धोनीच्या फेअरवेल सामन्यासाठी बीसीसीआय तयार 

बायर्नने बार्सिलोनाविरुद्ध 8 - 2 बाजी मारताना आपली ताकद दाखवली होती. मात्र बार्सिलोना तसेच लिऑनने बायर्नचा बचाव भेदता येतो हे दाखवले आहे. त्यामुळेच बायर्नचे मार्गदर्शक हॅन्सी फ्लीक पीएसजीविरुद्धच्या लढतीसाठी बचाव कसा भक्कम करतात याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असेल. पीएसजीला रॉबर्टो लेवान्डोव्हस्की याच्याबरोबर अल्फान्सो डेव्हिस याच्याकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. हा 19 वर्षीय खेळाडू बायर्नच्या आक्रमणांची सुरुवात करतो. बायर्नचा बचाव जम घेण्यास वेळ घेतो. त्या कालावधीत नेमार आणि पीएसजी बायर्नला किती हादरे देतात, हे सामन्याची दिशा ठरवू शकेल, पण निकाल नाही. बायर्नची ताकद सर्वांनीच अनुभवली आहे आणि पीएसजीही ती जाणून आहे. बायर्नच्या अतीआक्रमतेचा फायदा पीएसजीने घेतल्यास निकाल धक्कादायक लागू शकेल. 

लक्षवेधक 
- थेट प्रक्षेपण (भारतात) मध्यरात्री 12.30 पासून सोनी सिक्‍सवर 
- पीएसजीचे युरोपिय मानांकन पाच, तर बायर्नचे दोन. 
- 1998 नंतर प्रथमच चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीतील दोनही संघ राष्ट्रीय लीगचे          विजेते 
- प्रतिस्पर्धी संघाचे मार्गदर्शक मूळचे जर्मनीतील 
- पीएसजीचे मार्गदर्शक थॉमस टशेल यांनी यापूर्वी बोरुसिया डॉर्टमंड या बायर्नच्या          पारंपारीक प्रतिस्पर्ध्यांना मार्गदर्शन केले आहे 
- चॅम्पियन्स लीगमध्ये पीएसजीविरुद्ध दहा सामन्यात मिळून पाच गोल.


​ ​

संबंधित बातम्या