'सकाळ सोसायटी क्रिकेट लीग'मध्ये 128 संघ 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 April 2019

पुणे : "सकाळ'ने आयोजित केलेल्या पहिल्या "सकाळ सोसायटी क्रिकेट लीग' स्पर्धेसाठी 128 संघांनी सहभाग घेतला असून, या संघांना आठ गटांमध्ये विभागण्यात आले आहे. ही स्पर्धा 27 एप्रिलपासून सुरू होणार असून, विजेत्या संघास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. 

पुणे : "सकाळ'ने आयोजित केलेल्या पहिल्या "सकाळ सोसायटी क्रिकेट लीग' स्पर्धेसाठी 128 संघांनी सहभाग घेतला असून, या संघांना आठ गटांमध्ये विभागण्यात आले आहे. ही स्पर्धा 27 एप्रिलपासून सुरू होणार असून, विजेत्या संघास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. 

पंडित फार्म येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात रविवारी सोसायटी क्रिकेट लीग स्पर्धेसाठी "लकी ड्रॉ'च्या माध्यमातून संघ आणि त्यांचे क्रमांक काढण्यात आले. या वेळी "सकाळ माध्यम समूहा'चे बिझनेस हेड (इव्हेंट्‌स) राकेश मल्होत्रा, "रावेतकर हाउसिंग'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अमोल रावेतकर, "श्री वेंकटेश बिल्डकॉन'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अंकुश आसबे, "लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड'चे वरिष्ठ व्यवस्थापक विजय परदेशी, "एनपीएव्ही'चे संचालक संजीव केला आणि भागीदार स्वप्निल चांडक हे मान्यवर उपस्थित होते. 
सोसायटी क्रिकेट संघांच्या प्रतिनिधींनी या प्रसंगी मोठ्या संख्येने लावलेली उपस्थिती लक्षणीय होती. या स्पर्धेसाठी प्रेझेंटिंग स्पॉन्सर व्हीटीपी रिऍलिटी आहे. रावेतकर हाउसिंग, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सुहाना-प्रवीण मसालेवाले, श्री वेंकटेश बिल्डकॉन हे स्पर्धेचे ग्रुप ओनर आहेत. अँटिव्हायरस पाटनर्स एनपीएव्ही, तर हेल्थ पाटनर्स ज्युपिटर हॉस्पिटल आहे. 

"सकाळ सोसायटी क्रिकेट लीग' स्पर्धेसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरातील सोसायट्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली. प्रत्येक गटामध्ये 16 संघ असणार आहेत. 27 एप्रिलपासून प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हे सामने रंगणार आहेत. पहिल्यांदाच "हाफ पीच क्रिकेट स्पर्धा' होणार असून, प्रत्येक सामना सहा षटकांचा असणार आहे. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी आठ सामने होणार आहेत. 19 मे राजी अंतिम सामना होणार आहे. अधिक माहितीसाठी पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क साधवा ः 9518304361, 7517966772. 
 
अशी असेल "सकाळ सोसायटी क्रिकेट लीग' स्पर्धा : 
- एकूण : 128 संघ 
- आठ गट : प्रत्येक गटात 16 संघ 
- प्रत्येक सामना सहा षटकांचा असेल 
- 27 एप्रिलपासून प्रत्येक शनिवारी आणि रविवारी रंगतील सामने 
- अंतिम सामना : 19 मे 

पुरस्कार : बक्षीस (रुपयांमध्ये) 
- विजयी संघ : 1 लाख 
- उपविजेता : 50 हजार 
- मालिकावीर : 25 हजार 
- ऑरेंज कॅप (उत्कृष्ट फलंदाज) : 10 हजार 
- पर्पल कॅप (उत्कृष्ट गोलंदाज) : 10 हजार 
- उत्कृष्ट यष्टिरक्षक : 5 हजार 
- उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 5 हजार 
 

 


​ ​

संबंधित बातम्या