मी मंडळासाठी नाही, तर देशासाठी खेळतो : रशिद 

वृत्तसंस्था
Friday, 21 June 2019

इंग्लंडच्या फलंदाजांनी तर त्याच्या गोलंदाजीवर शंभरहून अधिक धावा नोंदविल्या. या सगळ्यानंतर रशीद खान आणि त्याचे कर्णधाराशी पटत नसल्याविषयी चर्चेला ऊत आला.

साऊदम्प्टन : अफगाणिस्तान क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्याचा दर्जा मिळाल्यापासून रशीद खान त्यांचा हिरो ठरला आहे. मात्र, या विश्‍वकरंडक स्पर्धेत तो कमालीचा अपयशी ठरला आहे.

इंग्लंडच्या फलंदाजांनी तर त्याच्या गोलंदाजीवर शंभरहून अधिक धावा नोंदविल्या. या सगळ्यानंतर रशीद खान आणि त्याचे कर्णधाराशी पटत नसल्याविषयी चर्चेला ऊत आला. अफगाणिस्तानचे कर्णधार बदलून गुलबदिन नैबकडे सोपविण्यात आले तेव्हापासून रशिद नाराज असल्याचे बोलले जात होते. पण, रशिदनेच या चर्चेला पूर्णविराम दिला.

तो म्हणाला, "मी गुलबदिन किंवा अफगाणिस्तान क्रिकेट मंडळासाठी नाही, तर देशासाठी क्रिकेट खेळतो. त्यामुळे कुणाशी पटण्या न पटण्याचा प्रश्‍नच येत नाही. असगर कर्णधार असताना जेवढे त्याला सहकार्य केले, तेवढेच सहकार्य गुलबदिनलाही करत आहे. मला माझी जबाबदारी माहित आहे आणि ती समजूनच मी खेळत राहणार.'' 


​ ​

संबंधित बातम्या