Alert! अफगाणिस्तान सुटलाय.. आयर्लंडला 126 धावांनी हरवलंय

वृत्तसंस्था
Wednesday, 22 May 2019

बेलफास्ट (आयर्लंड) : अफगाणिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आयर्लंडला 126 धावांनी हरविले. याबरोबरच अफगाणिस्तानने दोन सामन्यांची मालिकात 1-1 अशी बरोबरी सोडविली. 

बेलफास्ट (आयर्लंड) : अफगाणिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आयर्लंडला 126 धावांनी हरविले. याबरोबरच अफगाणिस्तानने दोन सामन्यांची मालिकात 1-1 अशी बरोबरी सोडविली. 

पहिला सामना आयर्लंडने 72 धावांनी जिंकला होता. या वेळी अफगाण फलंदाजांनी कामगिरी उंचावली. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 50 षटकांत 7 बाद 305 धावा केल्या. यात महंमद शहजादने 87 चेंडूंत शतकी खेळी केली. त्याने 101 धावा काढल्या. त्याने 88 चेंडूंना सामोरे जाताना 16 चौकार मारले. दुसऱ्या विकेटसाठी त्याने रहमत शाह (62) याच्या साथीत 150 धावांची भागिदारी रचली. तळातून नजीबउल्लाह झाद्रान याने नाबाद 60 धावा फटकावल्या. 33 चेंडूंत त्याने सात चौकार व तीन षटकारांची आतषबाजी केली. 
या आव्हानासमोर आयर्लंडचा डाव 41.2 षटकांत 179 धावांत संपुष्टात आला.

सलामीचा फलंदाज पॉल स्टर्लिंग याने 50 धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. त्यातच त्याचा अपवाद वगळता इतरांनी निराशा केली. अफगाण कर्णधार गुलबदीन नईब याने मध्यमगती माऱ्यावर 43 धावांत सहा विकेट टिपल्या. 
 


​ ​

संबंधित बातम्या