अजिंक्य रहाणेची छोटीशी मुलगी सांगतेय घराबाहेर पडायचं नाही.. पहा व्हिडीओ..
अजिंक्यची पत्नी राधिकाने त्यांची मुलीचा व्हिडीओ नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
कोरोना विषाणूने जगातभरात थैमान घातले आहे. जगभरात सगळीकडेच कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी तसेच परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशात २१ दिवसांचं लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या काळात जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धाही स्थगीत करण्यात आलेल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू घरात राहूनच आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवताना दिसत आहेत. भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेही हा देखील मुंबईतील घरातच आहे.
भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचे कारकीर्दीतील महत्त्वाचे लक्ष्य
अजिंक्यची पत्नी राधिकाने त्यांची मुलीचा व्हिडीओ नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. दोन लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहीलेल्या या व्हिडीओत अजिंक्य आपली मुलगी आर्याला, आता घराबाहेर पडायचं? असा प्रश्न विचारतो ज्यावर लहानगी आर्या नकारार्थी मान डोलावताना दिसत आहे.
राधिकाने पोस्ट केलेल्या या व्हिडीओला नेटिझन्सनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. अजिंक्यनेही सामाजिक भान राखत कोरोनाग्रस्तांच्या मदतकार्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा लाखांची मदत केली आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात अजिंक्य जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलीसोबत असतो. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना अजिंक्यने आपल्या दिनक्रमाबद्दल सांगितले होते.