अभिनेत्री संयमीच्या शुभेच्छा स्वीकारत रहाणे म्हणाला... 

अरुण मलाणी
Monday, 7 October 2019

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला कन्यारत्न झाल्यानिमित्त अभिनेत्री संयमी खेरने शुभेच्छा दिल्या. त्यावर रहाणेने बाळ सांभाळण्याच्या ड्युटीसाठी सज्ज राहण्याचा सुचित करीत मिस्कील प्रतिसाद दिला.

नाशिक - क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला कन्यारत्न झाल्याने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, अभिनेत्री संयमी खेरनेही रहाणे दांपत्याला शुभेच्छा दिल्या. यावर मिस्कीलपणे रिप्लाय देत अजिंक्‍य म्हणाला, धन्यवाद! बाळ सांभाळायला रात्रीच्या ड्युटीसाठी तुझा नंबर स्पीड डायलला ठेवतो.

संयमीने शालेय जीवनात क्रिकेटमध्ये अष्टपैलू कामगिरी केली आहे. तर एका ऑडीशनसाठी तिने डावखुरी क्रिकेटपटू म्हणून काही महिन्यांपूर्वी सराव करत शालेय जीवनाच्या क्रिकेटविषयी आपली आवड जोपासली. ट्‌विटरवरील रहाणेची पोस्ट शेअर करत तिने अभिनंदन केले. त्यावर रहाणेने अशी एक वाक्‍यात प्रतिक्रिया दिली.

Image may contain: 1 person, close-up

मूळची नाशिकची असलेल्या संयमीचे शालेय शिक्षण फ्रावशी ऍकॅडमी येथे झाले आहे. शालेय जीवनात फलंदाजी व गोलंदाजीतही चांगली कामगिरी करत तिने शालेय स्तरावरील क्रिकेट सामने गाजविले. आंतरशालेय स्पर्धेत तिच्या कामगिरीच्या जोरावर संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्याची माहिती तिचे प्रशिक्षक शेखर गवळी यांनी दिली. क्रिकेटसोबत बॅडमिंटन खेळात व मॅरेथॉन स्पर्धांमध्येही तिचा नेहमीच सहभाग राहिलेला आहे. 

अगदी काही महिन्यांपूर्वी तिने एका ऑडीशनसाठी डावखुरी क्रिकेटपटू बनून सराव केला. विशेष म्हणजे आपल्या नियमित खेळाप्रमाणे डावखुरे खेळतानाही तिने उत्तम कामगिरी केल्याचे श्री. गवळी यांनी सांगितले. सिनेक्षेत्रात ती गेली नसती, तर नक्कीच राष्ट्रीय स्तरावरील महिला क्रिकेटपटू झाली असती, असा विश्वासही ते व्यक्त करतात.

 


​ ​

संबंधित बातम्या