अमेरिकेतील सायकल शर्यतीत, अमृता शहा ठरल्या 'फिनिशर' 

वृत्तसंस्था
Thursday, 18 July 2019

सोलापूर : अमेरिकेत आयोजित सायकल शर्यतीत मूळच्या सोलापुरातील अमृता शहा यांनी 333 किलोमीटची ही शर्यत 34 तासांत पूर्ण करून "फिनिशर' ठरल्या आहेत. त्यांनी इतर महिलांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. 
यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

सोलापूर : अमेरिकेत आयोजित सायकल शर्यतीत मूळच्या सोलापुरातील अमृता शहा यांनी 333 किलोमीटची ही शर्यत 34 तासांत पूर्ण करून "फिनिशर' ठरल्या आहेत. त्यांनी इतर महिलांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. 
यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

अमेरिकेतील आशा फॉर एज्युकेशन संस्थेतर्फे आयोजित सायकल शर्यतीत अमृता शहा यांनी शनिवार व रविवारी सायकल चालवून सिएटल ते पोर्टलॅंड (एसटीपी) या शहरांतील 207 मैलाचे (333 किमी) अंतर एका दिवसात 18 तास सायकलिंग करून दोन दिवसांत एकूण 34 तासांत हे अंतर पूर्ण केले आहे. हे अंतर पूर्ण करून त्या या शर्यतीच्या फिनिशर ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील व जैन समाजातील त्या पहिल्याच महिला असल्याचे बोलले जाते. आशा संस्थेतर्फे दरवर्षी असे विविध उपक्रम राबवून निधी गोळा केला जातो. हा निधी भारतातील शिक्षणासाठी व अविकसित परिसरातील इतर गरजूंना कार्यक्रमासाठी वापरला जातो. हा एसटीपी उपक्रम 40 वर्षांपासून सुरू असून या दोन दिवसांच्या शर्यतीत आठ हजार युवक, युवती, महिला व ज्येष्ठांनी सहभाग घेतला होता. अमृता यांच्या सहभागामुळे व त्यांनी इतरांना प्रोत्साहन केल्याने सुमारे 1000 अमेरिकन डॉलर्स आशाकडे जमा झाले आहेत.


​ ​

संबंधित बातम्या