World Cup 2019: पिपाणी वाजवणाऱ्या आजींना आनंद महिंद्रांची खास ऑफर

वृत्तसंस्था
Wednesday, 3 July 2019

आजींना महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी मॅच विनर असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी या आजींना एक खास ऑफरही दिली आहे. आनंद महिंद्रा यांनी या आजी भारताचा सामना बघायला जाणार असतील तर त्यांच्या तिकीटांचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दाखवली आहे. आनंद महिंद्रा हे क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. अनेकदा ते ट्विटवरुन क्रिकेटसंदर्भातील ट्विट करत असतात.

मुंबई : विश्षचषक स्पर्धेत भारताने बांगलादेशला धावांनी नमवले. पण या सामन्याची चर्चा जेवढी रंगली होती, तेवढीच चर्चा मैदानात बसून टीम इंडियाला चिअर करणाऱ्या आणि पिपाणी वाजवणाऱ्या आजींचीही होती. केस पांढरे झालेल्या आजीबाईंनी सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. या आजीबाई केवळ सामन्याचा आनंद घेताना फलंदाजांनी चौकार, षटकार मारल्यावर लहान मुलांसारखी चक्क पिपाणी वाजवून आनंद व्यक्त करत होत्या.

या आजींना महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी मॅच विनर असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी या आजींना एक खास ऑफरही दिली आहे. आनंद महिंद्रा यांनी या आजी भारताचा सामना बघायला जाणार असतील तर त्यांच्या तिकीटांचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दाखवली आहे. आनंद महिंद्रा हे क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. अनेकदा ते ट्विटवरुन क्रिकेटसंदर्भातील ट्विट करत असतात.

महिंद्रा यांनी मात्र यावेळी भारतीय संघाचे सामना बघत नसल्याचे सांगितले आहे. मात्र कालच्या सामन्यादरम्यान एका खास कारणासाठी मी सामना पाहणार असल्याचे ट्विट केले होते. ‘मी सामान्यपणे भारताचे सामने पाहत नाही मात्र या आजींचा चेहरा पाण्यासाठी मी टिव्ही सुरु करणार आहे. त्या एखाद्या मॅच विनरच वाटतात,’ असे आनंद महिद्रांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

दरम्यान, दोन्ही गालांवर भारताचा झेंडा रंगवून पिपाणी वाजवणाऱ्या या आजींचं नाव चारूलता पटेल असे आहे. या आजींची झकल टिव्हीवर दाखवल्यानंतर काही क्षणांमध्ये ट्विटवर त्यांचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत.


​ ​

संबंधित बातम्या