आशियाई स्पर्धेत आहिल्या चव्हाणला चार रौप्यपदके 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 July 2019

कोल्हापूर -  कझाकिस्तान येथे झालेल्य आशिया चषक स्पर्धेत बायथल व ट्रायथल क्रीडा प्रकारात येथील आहिल्या सचिन चव्हाण हिने चार रौप्यपदके मिळविले. 

कोल्हापूर -  कझाकिस्तान येथे झालेल्य आशिया चषक स्पर्धेत बायथल व ट्रायथल क्रीडा प्रकारात येथील आहिल्या सचिन चव्हाण हिने चार रौप्यपदके मिळविले. 

आहिल्या ही आशिया चषक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. बायथल या क्रीडा प्रकारात जलतरण तसेच धावण्याच्या शर्यतीत दोन रौप्यपदक पटकाविले. ट्रायथल या प्रकारात सांघिक कामगिरी करत जलतरण, धावणे, व नेमबाजीत दोन रौप्य पदके मिळवून कोल्हापुरचे नाव उंचावले. 

आहिल्या ही कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद चव्हाण यांची नात आहे. माजी महापौर सागर चव्हाण यांची पुतणी असून माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण तसेच विद्यमान नगरसेविका जयश्री चव्हाण यांची कन्या आहे. 

इजिप्त येथे गेल्या वर्षी झालेल्या याच स्पर्धेत तिने रौप्य तसेच कास्य पदक मिळविले. ती खुल्या गटात खेळते. वयाच्या चौथ्या वर्षापासून तिला पोहण्याची आवड लागली. राज्य तसेच राष्ट्रीय स्पर्धेतही तिने चमक दाखविली. राज्य, राष्ट्रीय स्पर्घेत आतापर्यंत तिने 22 पदके मिळविली. तीन महिन्यापूर्वी आहिल्याची कझाकिस्तान येथील स्पर्धेसाठी निवड झाली होती. 
 


​ ​

संबंधित बातम्या