World Cup 2019 : गलीपोलीला भेट देऊन ऑसी भारावले 

सुनंदन लेले
Saturday, 25 May 2019

पहिल्या जागतिक युद्धाला शतकापेक्षा जास्त काळ होऊन गेला तरी त्याचे डाग पुसले जात नाहीत. 25 एप्रिल 2015 रोजी टर्की देशातील गलीपोली नावाच्या एका बेटावर युद्ध लढायला ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, इंग्लंड आणि भारताचे सैनिक उतरले. टर्की देशाच्या अधिकाऱ्यांनी अगोदरच तयारी करून ठेवल्याने दाखल झालेल्या सैन्याचे हाल हाल झाले.8700 ऑस्ट्रेलियन आणि 1300 भारतीय सैनिकांना या युद्धात प्राण गमवावे लागले. या भयावह कहाणीला उजाळा मिळाला जेव्हा विश्वकरंडक खेळायला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने गलीपोली युद्ध भूमीला भेट दिली आणि मृत सैनिकांना आदरांजली व्हायली. 

"गलीपोलीची कथा ऐकून आम्हां सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि सगळ्यांनाच घडलेल्या भयानक युद्धाची झळ काय होती हे समजले. विश्वकरंडक आणि पाठोपाठ ऍशेस मालिका खेळायला आलेल्या संघाला एकजूट करायला आम्ही हा घाट घातला होता. वॉर मेमोरीयलला गेल्यावर नेहमी दंगा मस्ती करणारे ऑस्ट्रेलियन खेळाडू भावनावश झालेले बघायला मिळाले'', ऑस्ट्रेलियन संघाचा मुख्य प्रशिक्षक जस्टीन लॅंगर म्हणाला. 

गलीपोलीला भेट आणि त्यानंतर संघाच्या सरावात काय फरक पडला असे विचारले असता फलंदाजीचा प्रशिक्षक रिकी पॉटींग म्हणाला, "कोणत्याही मोठ्या स्पर्धेच्या किंवा मालिकेच्या आव्हानाला सामोरे जाण्याअगोदर संघाची एकजूट होणे गरजेचे असते. गलीपोली भेटीनंतर खेळाडू काहीसे विचारमग्न झाले. सरावाला एक प्रकारची धार आली. सगळे एकमेकांबरोबर राहणे खेळण्याचा जास्त आनंद लुटू लागले. नेहमी कोणत्याही संघात खास मित्रांचे छोटे गट असतातच. नेहमी जेवायला फिरायला जाणे त्या गटाचे होते. गेल्या काही दिवसात बदल असा झालाय की कोणीही कोणाबरोबरही बाहेर जायला लागलाय. आनंदी वातावरणाचा स्पर्श संघाला झालेला आहे. ज्याने सरावात जोम आल्यासारखे वाटते. ही सगळी मला सुलक्षणे वाटतात'', पोटींग म्हणाला. 

चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणानंतर बंदीची शिक्षा भोगून डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियन संघात परतले. असे समजले की सुरुवातीला दोघांना सहजी वावरणे काहीसे कठीण गेले पण प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांनी तो काळ चतुराईने हाताळला. आता ते दोघे संघात पूर्वी सारखे मिसळले आहेत. आयपीएल खेळल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा स्पर्धात्मक थरार दोघांना अनुभवता आला. साहजिकच विश्वकरंडक खेळायला आल्यावर स्मिथ - वॉर्नरला मिसळायला कमी वेळ लागला. 

1 जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रलिया पहिला सामना खेळणार आहे. सगळ्यांचे खरे लक्ष 9 जूनला होणाऱ्या भारत वि ऑस्ट्रेलिया सामन्याकडे आहे. 

​ ​

संबंधित बातम्या