World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्रेंट बोल्टची हॅट्‌ट्रीक; न्यूझीलंडसमोर 244 धावांचे आव्हान 

वृत्तसंस्था
Saturday, 29 June 2019

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सनसनाटी हॅट्‌ट्रीक केली. किवींसमोर 244 धावांचे आव्हान आहे. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सनसनाटी हॅट्‌ट्रीक केली. किवींसमोर 244 धावांचे आव्हान आहे. 

प्रकाशझोतातील सामन्यात कांगारूंनी नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. त्यांनी निम्मा संघ 92 धावांत गमावला होता. यापूर्वीच्या सामन्यांत अपेक्षित सातत्य राखू न शकलेल्या ख्वाजाने किल्ला लढविला. त्याला यष्टिरक्षक-फलंदाज ऍलेक्‍स केरीने मोलाची साथ दिली. या जोडीने 107 धावांची भर घातली. केन विल्यमसन याने पुन्हा एकदा ही जोडी फोडली. त्याने केरीला बाद केले. तळातून कमिन्सने प्रतिकार केला. 

संक्षिप्त धावफलक : 
ऑस्ट्रेलिया ः 50 षटकांत 9 बाद 243 (डेव्हिड वॉर्नर 16, ऍरॉन फिंच 8, उस्मान ख्वाजा 88-129 चेंडू, 5 चौकार, स्टीव स्मिथ 5, मार्कस स्टॉयनीस 21, ग्लेन मॅक्‍सवेल 1, ऍलेक्‍स केरी 71-72 चेंडू, 11 चौकार, पॅट कमिन्स नाबाद 23, ट्रेंट बोल्ट 10-1-51-4, लॉकी फर्ग्युसन 10-0-49-2, जिमी निशॅम 6-0-28-2, केन विल्यमसन 7-0-25-1) 

बोल्टचा पराक्रम 
- अखेरच्या षटकात हॅट्‌ट्रीक नोंद 
- तिसऱ्या चेंडूवर बोल्टने उस्मान ख्वाजाचा (88) त्रिफळा 
- चौथ्या चेंडूवर प्रतिस्पर्धी डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची शून्यावर दांडी 
- पाचव्या चेंडूवर जेसन बेहरनडॉर्फ पायचीत असल्याचा मैदानावरील पंचांचा कौल 
- कांगारूंचा डीआरएसचा निर्णय घेतला. त्यात किवींच्या बाजूने निर्णय 
- विश्वकरंडकात हॅट्ट्रिक केलेला बोल्ट न्यूझीलंडचा पहिलाच गोलंदाज ठरला. 
- बोल्टची यापूर्वी गेल्या वर्षी 7 नोव्हेंबर रोजी अबुधाबीत पाकिस्तानविरुद्ध हॅट्‌ट्रीक 


​ ​

संबंधित बातम्या