सचिन, विराटला जमलं नाही, ते एलिस पेरीने 'करून दाखवलं!'

वृत्तसंस्था
Monday, 29 July 2019

या मालिकेपूर्वीच पेरी हिने टी- 20 क्रिकेटमध्ये बळींचे शतक पूर्ण केले आहे. टी- 20 क्रिकेटमध्ये 1000 धावा आणि 100 बळी मिळविणारी पैरी ही पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.

लंडन : ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू क्रिकेटपटू एलिसे पेरी हिने टी- 20 क्रिकेटमध्ये एक हजार धावा आणि बळींचे शतक अशी दुहेरी कामगिरी केली. अशी कामगिरी टी- 20 क्रिकेट खेळणाऱ्या पुरुष खेळाडूलाही जमलेली नाही.

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या या मालिकेतील दुसऱ्या टी- 20 सामन्यात पेरीने नाबाद 47 धावा करताना ही मजल मारली. या मालिकेपूर्वीच पेरी हिने टी- 20 क्रिकेटमध्ये बळींचे शतक पूर्ण केले आहे. टी- 20 क्रिकेटमध्ये 1000 धावा आणि 100 बळी मिळविणारी पैरी ही पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.

पुरुष क्रिकेटपटूंनाही कामगिरी जमलेली नाही. पाकिस्तानच्या आफ्रिदीला ही संधी होती. पण, तो निवृत्त झाला तेव्हा त्याने टी- 20 क्रिकेटमध्ये 1416 धावा केल्या आणि 98 बळी मिळविले. बांगलादेशाचा शकिब अल हसन या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या 1471 धावा आणि 88 बळी झाले आहेत.


​ ​

संबंधित बातम्या