ऍलिसा हिलीची विक्रमी खेळी

वृत्तसंस्था
Thursday, 3 October 2019

- ऑस्ट्रेलियाच्या ऍलिसा हिली याने टी- 20 क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वैयक्तिक सर्वोच्च खेळी करताना 61 चेंडूंत नाबाद 148 धावांची खेळी केली

- तिने मेग लॅनिंग हिचा नाबाद 133 धावांचा विक्रम मोडला

सिडनी ः ऑस्ट्रेलियाच्या ऍलिसा हिली याने टी- 20 क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वैयक्तिक सर्वोच्च खेळी करताना 61 चेंडूंत नाबाद 148 धावांची खेळी केली. हिलीने 46 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. महिला क्रिकेटमधील हे दुसरे वेगवान शतक होते. ऑस्ट्रेलियाने 3 बाद 226 धावा केल्या. हिली हिने षटकार ठोकत विश्‍वविक्रमाला गवसणी घातली. तिने मेग लॅनिंग हिचा नाबाद 133 धावांचा विक्रम मोडला. हिलीच्या या विक्रमी खेळीला लॅनिंग हिने नॉन स्ट्रायकरवरून टाळ्या वाजवून दाद दिली. हिलीने आपल्या खेळीत 19 चौकार आणि सात षट्‌कार लगावले. श्रीलंकेचा डाव 7 बाद 94 असा मर्यादित राहिला. ऑस्ट्रेलियाने 132 धावांनी विजय मिळविला. ऑस्ट्रेलियाकडून कॅरी हिने 15 धावांत 3 गडी बाद केले. 


​ ​

संबंधित बातम्या