आंध्र प्रदेशकडून सिंधूला ३० लाख 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 August 2021

गेल्या दोन ऑलिंपक स्पर्धांमध्ये सलग दोन पदके जिंकण्याऱ्या पी. व्ही. सिंधूला आंध्र प्रदेश सरकारकडून ३० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे; परंतु हे बक्षीस मागील वेळेच्या बक्षिसाच्या रकमेपेक्षा कमी आहे.

हैदराबाद - गेल्या दोन ऑलिंपक स्पर्धांमध्ये सलग दोन पदके जिंकण्याऱ्या पी. व्ही. सिंधूला आंध्र प्रदेश सरकारकडून ३० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे; परंतु हे बक्षीस मागील वेळेच्या बक्षिसाच्या रकमेपेक्षा कमी आहे. सिंधूने गेल्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविल्यानंतर तिला आंध्र प्रदेश सरकारकडून तब्बल तीन कोटींचे बक्षीस देण्यात आले होते.

या वर्षीच्या स्पर्धेतही सिंधूने संघर्षपूर्ण खेळी करत भारतासाठी ब्रॉँझपदक जिंकले. देशासाठी सलग दोन स्पर्धांमध्ये पदक मिळविणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली. यापूर्वी हा पराक्रम कुस्तीपटू व सध्या तुरुंगात असणाऱ्या सुशील कुमारने केला होता. 

सुशील कुमारने २००८ च्या बीजिंग स्पर्धेत रौप्य व २०१२ च्या लंडन स्पर्धेत ब्राँझपदक जिकले होते. सिंधूने सलग दुसरे पदक जिंकताना चीनच्या बिंग जिआयो हिचा २१-१३,२१-१५ असा पराभव केला आहे.

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासऑलिंपिकपटू खास निमंत्रित
नवी दिल्ली - लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या प्रमुख सोहळ्यास ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या सर्व खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी निमंत्रित करणार आहेत. त्या वेळी पंतप्रधान खेळाडूंसह संवादही साधणार आहेत.  लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाचा सोहळा झाल्यावर पंतप्रधान खेळाडूंची आपल्या निवासस्थानी खास भेटही घेणार आहेत. टोकियोतील या स्पर्धेसाठी भारताचे आतापर्यंतचे सर्वाधिक खेळाडू पात्र ठरले. टोकियोतील या स्पर्धेसाठी भारताचे १२१ खेळाडूंसह २२८ सदस्यांचे पथक गेले होते.


​ ​

संबंधित बातम्या