बॅडमिंटन स्टार प्रकाश पदुकोण प्रकृतीत सुधारणा

पीटीआय
Wednesday, 5 May 2021

कोरोनाबाधित झालेल्या माजी बॅडमिंटन स्टार प्रकाश पदुकोण यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्या बंगळूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बंगळूर - कोरोनाबाधित झालेल्या माजी बॅडमिंटन स्टार प्रकाश पदुकोण यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्या बंगळूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकलेले पहिले भारतीय पदुकोण ६५ वर्षांचे आहेत. त्यांना या आठवड्यातच रुग्णालयात घरी पाठवले जाण्याची शक्यता आहे, असे प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीचे संचालक विमल कुमार यांनी सांगितले. 

दहा दिवसांपूर्वी प्रकाश, त्यांची पत्नी (उज्जाला) आणि दुसरी मुलगी (अनिशा) यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसली होती. चाचणीत ते कोरोना बाधित असल्याचे लक्षात आहे, असे प्रकाश पदुकोण यांचे नजीकचे मित्र विमल कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, पदुकोण कुटुंबीय त्यानंतर एक आठवडा विलगीकरणात होते; पण प्रकाश यांचा ताप कमी होत नव्हता. त्यामुळे त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती चांगली आहे. दोन - तीन दिवसांत त्यांना घरी सोडण्यात येईल. पत्नी आणि मुलगी घरीच आहेत. त्यांचीही प्रकृती सुधारत आहे, असेही ते म्हणाले.


​ ​

संबंधित बातम्या