परदेशी मार्गदर्शकांवर पूर्णतः विसंबून रहाणे चुकीचे ठरेल - गोपीचंद

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 May 2021

परदेशी आणि भारतीय मार्गदर्शक असे मिश्रण भारतात खेळाच्या प्रगतीसाठी योग्य फॉर्म्युला ठरू शकेल, परंतु पूर्णतः परदेशी मार्गदर्शकांवर विसंबून रहाणे चुकीचे ठरेल.

नवी दिल्ली - परदेशी आणि भारतीय मार्गदर्शक असे मिश्रण भारतात खेळाच्या प्रगतीसाठी योग्य फॉर्म्युला ठरू शकेल, परंतु पूर्णतः परदेशी मार्गदर्शकांवर विसंबून रहाणे चुकीचे ठरेल. दुसऱ्या श्रेणीचे परदेशी मार्गदर्शक आपल्याकडे दुय्यम श्रेणीचेच खेळाडू तयार करू शकतील, असे रोखठोक मत नामवंत बॅडमिंटन खेळाडू आणि प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले.

क्रीडा प्राधिकरणाच्या हाय परफॉर्मन्स प्रशिक्षक मार्गदर्शक कार्यक्रमात गोपीचंद यांनी प्रशिक्षकांबाबत स्पष्ट मत मांडले. आपल्या देशात खेळातील प्रगतीसाठी परदेशी मार्गदर्शकांचे महत्त्व मोठे आहे, परंतु पूर्णतः त्यांच्यावर विसंबून न राहता भारतीय मार्गदर्शकांचीही त्याला जोड देणे तेवढेच महत्त्वाचे आहे, असे गोपीचंद म्हणाले.

आपल्याकडे प्रत्येक खेळात तज्ञ मार्गदर्शक नाही, अशावेळी परदेशी मार्गदर्शकांचे साह्य घेणे व्यवहार्य ठरेल, परंतु ते कायमस्वरूपी नसावे, पूर्ण कारभार परदेशी मार्गदर्शकांकडे दिल्यास आपण आपल्याकडे असलेल्या रचनेला न्याय देऊ शकत नाही. त्यासाठी प्रशिक्षणाचा पाया आपल्या मार्गदर्शकाकडे द्यावा, असे गोपीचंद यांनी म्हटले आहे.


​ ​

संबंधित बातम्या