मरीन नसली म्हणजे स्पर्धा सोपी नव्हे; सिंधूचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 June 2021

कॅरोलिन मरीन नसली म्हणजे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा माझ्यासाठी सोपी झाली असे मी समजण्याचा प्रश्नच येत नाही. जगातील अव्वल १० खेळाडूंचा दर्जा जवळपास सारखाच आहे, असे जागतिक विजेत्या पी व्ही सिंधूने सांगितले.

नवी दिल्ली - कॅरोलिन मरीन नसली म्हणजे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा माझ्यासाठी सोपी झाली असे मी समजण्याचा प्रश्नच येत नाही. जगातील अव्वल १० खेळाडूंचा दर्जा जवळपास सारखाच आहे, असे जागतिक विजेत्या पी व्ही सिंधूने सांगितले.

डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे मरीन ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेस मुकणार आहे. रिओमध्ये सिंधू अंतिम फेरीत मरीनविरुद्ध हरली होती. याकडे लक्ष वेधल्यावर सिंधू म्हणाली, महिला एकेरीत अव्वल १० खेळाडू एकमेकींच्या तोडीच्या आहेत. एखादी नसेल, तर स्पर्धा सोपी होत नाही. स्पर्धेत तई झू यिंग, रॅचनॉक इनतॅनॉन, नोझोमी ओकुहारा, अकेन यामागुची यासारख्या खेळाडू आहेत. एखादी नसेल, तर स्पर्धा सोपी होईल असे म्हणणे अयोग्य आहे. मी तर रिलॅक्स होण्याचा प्रश्नच नाही. माझे पूर्ण लक्ष स्पर्धा पूर्वतयारीवर आहे, असे तीने सांगितले.

चेन यू फेई आणि हे बिंग जिओ या चीनच्या खेळाडूंनी दीर्घ ब्रेक घेतला आहे. त्यांचा खेळ काही महिन्यांत पाहिलेला नाही. ऑलिंपिक आणि अन्य स्पर्धांची तुलनाच होत नाही. त्या वेळी जबरदस्त दडपण असते, असेही पी. व्ही. सिंधूने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या