Orleans Master: साईना सेमीफायनलमध्ये अडखळली; कृष्णा-विष्णू फायनलमध्ये

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 27 March 2021

तिने  28 मिनिटांत 21-17, 21-17 असा सामना खिशात घालत साईनाचा खेळ खल्लास केला.

भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेत्या साईना नेहवालच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आलीय. ऑर्लन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे एखाद्या स्पर्धेत फायनलपर्यंत पोहचण्याची तिची प्रतिक्षा आणखी वाढली आहे. स्पर्धेतील चौथ्या आणि जागतिक क्रमावारीत 20 व्या मानांकित साईनाला डेन्मार्कच्या 38 व्या मानांकित  लीने क्रिस्टोफरसेन हिने पराभवाचा धक्का दिला. तिने  28 मिनिटांत 21-17, 21-17 असा सामना खिशात घालत साईनाचा खेळ खल्लास केला.  

INDvsENG : वनडे दरम्यान पुण्याच्या टेकडीवर रंगला होता सट्टेबाजीचा खेळ

महिला एकेरीशिवाय दुहेरी प्रकारातही भारताच्या पदरी निराशाच आली. अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी या भारताच्या जोडीला महिला दुहेरीत सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय जोडीला थायलंडच्या जोडीने 21-18,21-9 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. दुसरीकडे कृष्णा आणि विष्णू या जोडीने भारतीय ताफ्यात उत्साह निर्माण करणारी कामगिरी करुन दाखवली. भारताच्या या जोडीनं पुरुष दुहेरीत इंग्लंडच्या कॅल्युअम हेमिंग आणि स्टीव्ह स्टॅलवूड जोडी विरुद्ध 35 मिनिटे रंगलेल्या सामन्यात विजय नोंदवला. या लढतीती  21-17 21-17 या विजयासह त्यांनी फायनल गाठली आहे. ही  यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच एकत्र कोर्टवर उतरली आहे. रविवारी फायनलमध्ये ही जोडी सुवर्ण कामगिरी करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

INDvsENG : थर्ड अंपायरने स्टोक्सला दिले नॉट आउट, कोहली झाला नाराज​

कृष्णा प्रसाद आणि विष्णू वर्धन जोडीने सुरुवातीपासून 4-2 आघाडी घेतली होती. पण त्यानंतर  इंग्लिश गड्यांनी दमदार कमबॅक करत 11-8 अशी आघाडी घेतली. रंगतदार सेटमध्ये सामना 13-13 असा बरोबरीत आला आणि त्यानंतर भारतीय जोडीने प्रतिस्पर्ध्यांना केवळ तीन पॉइंट देत सामना खिशात घातला. 


​ ​

संबंधित बातम्या