Orleans Masters 2021 : वर्षभराच्या संघर्षानंतर साईनानं गाठली उपांत्यपूर्व फेरी

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 26 March 2021

 साईनाने पहला सेट गमावल्यानंतर दमदार कमबॅक केले. 51 मिनटे चालल्या लढतीत तिने अखेर विजय नोंदवत उपांत्य पूर्व फेरी गाठली आहे.  

मुंबई - साईना नेहवालने ऑर्लन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिने फ्रान्सच्या मारिया बातोमेने हिचे आव्हान 18-21, 21-15, 21-10 असे परतवले. पहिला गेम गमावल्यावर साईनाने 51 मिनिटांतील लढत जिंकली. इसा शर्मानेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना बल्गेरियाच्या मान्या मित्सोवा हिला 21-18, 21-13 असे पराजित केले. तब्बल 12 महिन्यांच्या काळावधीनंतर साईना नेहवालने एखाद्या स्पर्धेत अंतिम आठमध्ये स्थान मिळवले आहे.

लंडन ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेत्या साईनाने पहला सेट गमावल्यानंतर दमदार कमबॅक केले. 51 मिनटे चालल्या लढतीत तिने अखेर विजय नोंदवत उपांत्य पूर्व फेरी गाठली आहे. दुखापतीमुळे ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमधून माघार घेणाऱ्या साईनासमोर आता  फ्रान्सच्या येली होयॉक्स आणि मलयेशियाची आइरिस वांग यांच्यातील विजेत्याशी लढत होणार आहे. 

ISSF World Cup : भारताची सुवर्ण दशकपूर्ती

दुसरीकडे पुरुष एकेरीमध्ये श्रीकांतने मलयेशियाच्या के चेम जून वेईला 46 मिनटांच्या लढतीनंतर पराभूत केले, 21-17, 22-20 असा विजय मिळवत त्याने स्पर्धेतील आगेकूच सुरु ठेवली आहे.  जागतिक क्रमवारीत 162 व्या स्थानावर असलेल्या इराने 71 व्या स्थानावरील बुल्गारियाच्या मारिया मितसोवाचा खेळ 32 मिनटांत खल्लास करत 21-18, 21-13 असा विजय मिळवून अंतिम आठमध्ये प्रवेश केला. चिराग सेनला तिसऱ्या फेरीत डेनमार्कच्या हंस-क्रिस्टियन सोलबर्ग विरुद्धच्या लढतीत 21-14,9-21,17-21 असा पराभवाचा सामना करावा लागला.  

अर्जुन आणि ध्रुवची जोडीचा ही विजय

 पुरुष दुहेरीत एम आर अर्जुन आणि ध्रुव कपिला जोडीने इंग्लंडच्या जेड रस आणि रोरी एस्टन जोडीला 29 मिनटांच्या खेळात पराभूत केले. त्यांनी हा सामना 21-11,21-12 अशा फरकाने जिंकत क्वार्टर फायनल गाठली आहे. अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी जोडी महिला दुहेरीत आगेकूच केली. डेनमार्कच्या अमेली मेगलुंड आणि फ्रेजा रावन यांना 21-9, 17-21, 21-19 ने पराभूत करत त्यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या