गटचाचणीत सिंधूला चांगले यश

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 July 2021

जागतिक विजेत्या पी. व्ही. सिंधूने ऑलिंपिक बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसरी साखळी दोन गेममध्ये जिंकत गटविजेतेपद जिंकण्याची औपचारिकता पूर्ण केली. मात्र बाद फेरीतील खडतर आव्हान सुरू होण्यापूर्वीच्या चाचणीत चांगले यश मिळाल्याचे तिला समाधान होते, पण त्याचवेळी झालेल्या काही चुका सलत होत्या.

टोकियो/मुंबई - जागतिक विजेत्या पी. व्ही. सिंधूने ऑलिंपिक बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसरी साखळी दोन गेममध्ये जिंकत गटविजेतेपद जिंकण्याची औपचारिकता पूर्ण केली. मात्र बाद फेरीतील खडतर आव्हान सुरू होण्यापूर्वीच्या चाचणीत चांगले यश मिळाल्याचे तिला समाधान होते, पण त्याचवेळी झालेल्या काही चुका सलत होत्या.

सिंधूने हाँगकाँगच्या चेऊंग गान हिच्याविरुद्धची लढत २१-९, २१-६ अशी  मिनिटात जिंकली. जागतिक क्रमवारीत ३४ व्या असलेल्या चेऊंगविरुद्धची सिंधूची ही पाचवी लढत होती, पण दोघींत २०१७ नंतर प्रथमच सामना होत होता. तो सिंधूने ३५ मिनिटांत जिंकला. 

सिंधूने तिच्या भात्यातील सर्व स्ट्रोक्सचा वापर करून पाहिला. त्याचबरोबर रॅली सुरू असताना शटलच्या गतीत बदल करण्यातही तिला चांगले यश आले. प्रतिस्पर्धीस कोर्टवर नाचवत सिंधूने ओपन स्पेस तयार केल्या आणि त्या जागी स्मॅश आणि ड्रॉप्स करीत गुण मिळविले.

ही लढत नक्कीच सोपी नसेल. मला या सामन्यासाठी पूर्ण तयारीने यावे लागेल. आमच्या दोघीत यापूर्वी अनेकदा लढत झाली. त्या सर्व लढतींप्रमाणे यावेळीही प्रत्येक गुण मोलाचा असेल. ती कमालीची आक्रमक आहे, त्यामुळे मलाही आक्रमणास तयार रहावे लागेल.
- पी. व्ही. सिंधू, आजच्या लढतीबद्दल

दुसऱ्या गेममध्ये मला चांगली लय सापडली आणि तो गेमही त्यानंतर लगेच संपविला. हा कमालीचा वेगवान गेम होता. त्यात माझ्याकडून काही चुकाही झाल्या. खेळात काही बदल केल्यावर सर्व काही नियंत्रणात आले. महत्त्वाच्या लढतीपूर्वी या प्रकारची चाचणी मोलाची असते.
- पी. व्ही. सिंधू

आजचे आव्हान

  • सिंधूची आज लढत मिआ ब्लशफेल्ड हिच्याविरुद्ध
  • डेन्मार्कची मिआ क्रमवारीत १२ वी तर सिंधू सहावी.
  • प्रतिस्पर्धीतील पाच लढतीत सिंधूचे चार विजय
  • थायलंड ओपनमध्ये सिंधूची हार, त्यानंतरच्या स्पर्धेत सिंधूचा विजय

अशी झाली लढत
तपशील             सिंधू    चेऊंग

जिंकलेले गुण        ४२       २५
सलग गुण             ६         ४
सर्व्हिसवरील गुण   २५       ९
सर्व्हिसविना गुण    १७      १६
मोठी आघाडी        १२       १


​ ​

संबंधित बातम्या