ऑलिंपिक क्रीडा बॅडमिंटन स्पर्धा गटात खडतर आव्हान चांगलेच

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 July 2021

ऑलिंपिक क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेत सात्विकसाईराज रांकिरेड्डी - चिराग शेट्टी हे दुहेरीत पदकाची धक्कादायक भेट देतील, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. गटात खडतर आव्हान चांगलेच आहे, असे सात्विकसाईराजने सांगितले.

हैदराबाद - ऑलिंपिक क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेत सात्विकसाईराज रांकिरेड्डी - चिराग शेट्टी हे दुहेरीत पदकाची धक्कादायक भेट देतील, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. गटात खडतर आव्हान चांगलेच आहे, असे सात्विकसाईराजने सांगितले.

गटात खडतर आव्हान चांगलेच असते. त्यामुळे आगामी आव्हानासाठी तयारी होते. गटसाखळी पार केली, तर आम्ही पदक जिंकण्याची शक्यता नक्कीच उंचावेल. गेल्या काही महिन्यांत स्पर्धात्मक लढतींपासून वंचित होतो, ही उणीव गटसाखळीत दूर होईल, असे सात्विक म्हणाला. 

गटसाखळीत दडपण प्रतिस्पर्ध्यांवर असेल. ते आमच्यापेक्षा सरस आहेत. त्यामुळे त्यास साजेसा खेळ करण्याची त्यांच्याकडून अपेक्षा असेल. ऑल इंग्लंड स्पर्धेतील सुरुवातीच्या लढती पाहून अनेकांना आमच्या तंदुरुस्ती, क्षमतेविषयी शंका वाटत होती; पण आम्ही त्याचाच फायदा घेतला, असे सात्विकने सांगितले. 

भारतीय जोडीची सलामीला लढत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या असलेल्या ली यांग - वँग चीन लिन या तैवानच्या जोडीविरुद्ध होईल. त्यांना गटात अव्वल मानांकित केविन संजया सुकार्नुल्जो - मार्कस फर्नाल्डी गिडॉन यांचे आव्हान असेल.

सात्विक - चिरागला मथायस बोए यांचे मार्गदर्शक लाभत आहे. याबाबत सात्विक म्हणाला, बोए यांनी आम्हाला गेम झटपट कसा जिंकता येतो हे दाखविले. खेळातील सातत्य राखण्यासाठी त्यातील चढऊतार कमी करण्याची गरज असते. त्यासाठी सामन्याची आखणी मोलाची असते.


​ ​

संबंधित बातम्या