जागतिक बॅडमिंटन स्पर्धा भारतात रंगणार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 July 2021

भारतातील २०२३ ची सुदिरामन कप सांघिक बॅडमिंटन स्पर्धा संयोजन चीनला देताना आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने २०२६ च्या जागतिक स्पर्धेचे यजमानपद भारतास दिले आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धा संयोजन यामुळे भारतात दुसऱ्यांदा होणार आहे.

मुंबई - भारतातील २०२३ ची सुदिरामन कप सांघिक बॅडमिंटन स्पर्धा संयोजन चीनला देताना आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने २०२६ च्या जागतिक स्पर्धेचे यजमानपद भारतास दिले आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धा संयोजन यामुळे भारतात दुसऱ्यांदा होणार आहे. 

ऑलिंपिक वर्ष सोडल्यास दर वर्षी जागतिक बॅडमिंटन स्पर्धा होत असते. भारतात ही स्पर्धा यापूर्वी २००९ मध्ये हैदराबादला झाली होती. भारतात २०१४ मध्ये थॉमस - उबेर कप स्पर्धाही झाली होती. खरे तर भारतास २०२३ च्या सुदीरामन कप मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेचे संयोजन देण्यात आली होते. मात्र २०२१ ची सुदीरामन कप चीनऐवजी फिनलंडला घेताना जागतिक महासंघाने भारतातील २०२३ ची स्पर्धा चीनला दिली आहे. 

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा संयोजनामुळे भारत बॅडमिंटन जगतातील ताकद असल्याचे निश्चित होईल. या महत्त्वाच्या स्पर्धेच्या संयोजनामुळे भारतीय बॅडमिंटन संघटना तसेच देशाची शान वाढवणार आहे, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष हेमंत बिस्व सर्मा यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या