World Cup 2019 : कुलदीपच्या 'त्या' चेंडूची किंमत दीड लाख रुपये

वृत्तसंस्था
Saturday, 13 July 2019

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याने केवळ आयसीसीच नाही, तर अनेकांचे उखळ पांढरे झाले. या सामन्यासाठी सर्वाधिक तिकिट विक्री झाली. केवळ तिकिट विक्री नाही, तर ब्लॅकही भरपूर झाले, जाहिरातींचा भावही कमीलाचा वाढला होता. इतकेच नाही, तर या सामन्यातील चेंडू, स्कोअर शीट आणि नाणेफेकीसाठी वापरण्यात आलेले नाणे यांना लिलावात मोठी किमत मिळाली. 

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याने केवळ आयसीसीच नाही, तर अनेकांचे उखळ पांढरे झाले. या सामन्यासाठी सर्वाधिक तिकिट विक्री झाली. केवळ तिकिट विक्री नाही, तर ब्लॅकही भरपूर झाले, जाहिरातींचा भावही कमीलाचा वाढला होता. इतकेच नाही, तर या सामन्यातील चेंडू, स्कोअर शीट आणि नाणेफेकीसाठी वापरण्यात आलेले नाणे यांना लिलावात मोठी किमत मिळाली. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर सामन्यात वापरल्या जाणाऱ्या चेंडू, नाणेफेकीसाठी वापरलेले नाणे अशा गोष्टींचा लिलाव करण्याचा पायंडा अलिकडेच पडला आहे. आयसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर लिलावासाठी भारतीय संघाशी निगडीत 27 गोष्टी देण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे यातील केवळ तीन गोष्टी आता बाकी आहेत. सर्वाधिक किंमत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील चेंडू, स्कोअरशीट, नाण्याला मिळाली आहे. 

'तो' चेंडू कुलदीपचा 
एकदिवसीय सामन्यात अलिकडे दोन चेंडू वापरतात. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वापरलेल्या ज्या चेंडूला सर्वाधिक 2150 डॉलर म्हणजे जवळपासी 1.50 लाख रुपये इतकी किंमत मिळाली तो चेंडू कुलीदप यादवने टाकलेला आणि बाबर आझमची विकेट मिळविलेला होता. कुलदीपने त्या सामन्यात बाबरची विकेट घेतली तो चेंडू अफलातून वळला होता. तेव्हापासूनच तो चर्चेत आला. क्रिकेट पंडितांनी त्या चेंडूची तुलना शेन वॉर्नच्या "शतकातील सर्वोत्तम चेंडू'शी केली होती. विशेष म्हणजे हा चेंडू सामना झाल्या दिवशीच झालेल्या लिलावात विकला गेला. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खेळाडूंपेक्षा त्यांच्या चाहत्यांसाठी देखील खूप मोठा असतो. या सामन्याची आठवण म्हणून अनेक जण काही ना काही वस्तू खरेदी करतात. या सामन्यात नाणेफेकीसाठी वापरलेल्या नाण्याला 1450 डॉलर (अंदाजे 1 लाख रुपये) आणि स्कोअर शीटला 1100 डॉलर (अंदाजे 77 हजार रुपये) इतका भाव मिळाला.


​ ​

संबंधित बातम्या