World Cup 2019 : पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाहीच; बीसीसीआयचा मोठा निर्णय
भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वकरडंकात 16 जूनला सामना होणार आहे. काही दिवसांपूर्वी या दोन्ही देशांमधील सामना होईल असे वाटत होते मात्र, आता बीसीसीआयने खूप मोठे पाऊल उचलले आहे.
वर्ल्डकप 2019 : मुंबई : जून महिन्यात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत बीसीसीसआयने आज मोठा निर्णय घेतला. विश्वकरंडकात भारत पाकिस्तानविरुद्ध खेळणार नसल्याचे बीसीसीआयने आज जाहीर केले. काश्मिरमधील पुलावामा येथे झालेल्या दहशतबादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
बीसीसीआयने यापूर्वीच दहशतवादाशी संबधित असणाऱ्या देशांबरोबर आयसीसीने संबध तोडावेत अशी मागणी केली आहे. ''आम्ही चर्चा करुन हा निर्णय घेतला आहे. आम्ही नेहमी देशालाच प्राधान्य देऊ. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानशी खेळणे म्हणजे देशवासियांना अनादर करण्यासारखे आहे,'' असे मत प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद यांनी व्यक्त केले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वकरडंकात 16 जूनला सामना होणार आहे. काही दिवसांपूर्वी या दोन्ही देशांमधील सामना होईल असे वाटत होते मात्र, आता बीसीसीआयने खूप मोठे पाऊल उचलले आहे.
''आम्ही सर्व परिस्थितीचा विचार करुन पाकिस्तान न खेळणेच देशासाठी सर्वात योग्य आहे असा निर्णय घेतला आहे. आम्ही आयसीसीला यापूर्वीच दहशवाद्यांना पोसणाऱ्या देशांवर कारवाई करण्यास सांगितले आहे मात्र, त्यांनी या विषयात न पडण्याचे ठरविले आहे. म्हणूनच आम्ही आमा निर्णय घेण्याचे ठरविले आहे,'' असेही राय यांनी स्पष्ट केले.
सर्वांना April Foolच्या हार्दीक शुभेच्छा!