"कार्यकाळा'च्या नव्या अटीमुळे बीसीसीआय निवडणुकीत पेच

वृत्तसंस्था
Wednesday, 18 September 2019
नवी दिल्ली ः बदल केलेल्या "पदाधिकारी कार्यकाळ' या नियमाची अंमलबजावणी करण्याची सूचना प्रशासकीय समितीने केल्यामुळे भारतीय क्रिकेट मंडळाशी संलग्न असलेल्या 30 पेक्षा अधिक संघटनांपुढे पेच निर्माण झाला आहे. परिणामी, बीसीसीआयच्या येत्या निवडणुकीत या संघटनांपुढे मतदानाच्या हक्कासंदर्भात अडचण निर्णाण होऊ शकते.
नवी दिल्ली ः बदल केलेल्या "पदाधिकारी कार्यकाळ' या नियमाची अंमलबजावणी करण्याची सूचना प्रशासकीय समितीने केल्यामुळे भारतीय क्रिकेट मंडळाशी संलग्न असलेल्या 30 पेक्षा अधिक संघटनांपुढे पेच निर्माण झाला आहे. परिणामी, बीसीसीआयच्या येत्या निवडणुकीत या संघटनांपुढे मतदानाच्या हक्कासंदर्भात अडचण निर्णाण होऊ शकते.
बीसीसीआय निडवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सघटनांच्या निवडणुका 28 सप्टेंबर रोजी होणे अपेक्षित आहे; परंतु प्रशासकीय समितीने सहा वर्षांच्या कार्यकाळामध्ये आता कार्यकारी समितीमधील कालावधीही अंतर्भूत करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे राज्य संघटनांना नव्याने जुळवाजुळव करावी लागणार आहे. परिणामी या निवडणुका पुढे जाण्याची शक्‍यता आहे.
कोणत्याही पदाचा कार्यकाळ संपला की तीन वर्षांचा "कूलिंग ऑफ' कालावधी बंधनकारक आहे. मूळ कार्यकाळात आता कार्यकारी समितीतील कालावधीचाही समावेश केल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. या अटीमुळे मतदानाचे हक्क असलेले 80 टक्के सदस्य बाद होतील, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुली आणि गुजरात क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव जय शहा यांचाही समावेश आहे.
सहा वर्षांच्या अटीनुसार गांगुली आणि शहा यांचा 10 महिन्यांचाच कार्यकाळ शिल्लक आहे, पण आता कार्यकारी समितीतील काळ यामध्ये गणला गेला तर त्यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे प्रशासकीय समितीला निवडणूक घ्यायची आहे की पुढे ढकलायची आहे? निवडणुकीअगोदर सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी, असे मत बीसीसीआयच्या एका माजी सचिवांनी व्यक्त केले.
आपल्या निवडणुका कशा घ्यायच्या याची सूचना मिळण्यासाठी किमान 10 राज्य संघटनांनी न्यायमित्र पीएस नरसिम्हा यांच्याशी संपर्क साधलेला आहे. त्याच वेळी 25 संघटनांनी निवडणुकीची तयारी आणि प्रक्रिया सुरू केलेली आहे; परंतु नव्या अटीमुळे त्यांच्यासमोर संभ्रम निर्माण झाला आहे

फोटो गॅलरी

​ ​

संबंधित बातम्या