परवानगी न घेता दुबईत खेळलाच कसा? बीसीसीआयकडून रिंकू सिंग निलंबित

वृत्तसंस्था
Friday, 31 May 2019

मान्यता नसलेल्या दुबईतील ट्‌वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत खेळल्याबद्दल उत्तर प्रदेशातील आणि भारत 'अ' संघाचा खेळाडू रिंकू सिंगला बीसीसीआयने निलंबित केले आहे. 

मुंबई : मान्यता नसलेल्या दुबईतील ट्‌वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत खेळल्याबद्दल उत्तर प्रदेशातील आणि भारत 'अ' संघाचा खेळाडू रिंकू सिंगला बीसीसीआयने निलंबित केले आहे. 

या स्पर्धेत खेळण्यासाठी रिंकूने बीसीसीआयची परवानगी घेतली नव्हती. असे करताना त्याने बीसीसीआयच्या नियमाचा भंग केला. बीसीसीआयशी संलग्न असलेला कोणताही खेळाडू संघटनेची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही स्पर्धेत खेळू शकत नाही. रिंकून सिंगने या नियमाचा भंग केल्यामुळे त्याच्यावर तीन महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही बंदी 1 जून 2019 पासून सुरू होईल. 

रिंकू सिंगचा भारत 'अ' संघात समावेश होता. श्रीलंकेविरुद्धचा चार दिवसांचा सामना उद्यापासून सुरू होणार आहे. त्याचे नाव भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या