World Cup 2019 : भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान खोडसाळपणा; बीसीसीआयची तक्रार

सुनंदन लेले 
Sunday, 7 July 2019

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) याबाबत लेखी तक्रार केली आहे. आयसीसीने अशा प्रकारच्या प्रचाराला विरोध केला आणि आक्षेपही नोंदवला होता. यॉर्कशायर पोलिसांना आयसीसीने अगोदर सांगूनही अशा प्रकारचा खोडसाळपणा चालूच राहिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

लंडन : भारत आणि श्रीलंका यांच्यात शनिवारी हेडिंग्ले मैदानावर चालू असताना छोट्या विमानाला पतंगाच्या शेपटीसारखे बॅनर लावून भारत विरोधी प्रचार चालू होता. कधी कश्मीरमधला अत्याचार थांबवा’ तर कधी जमाव हत्या थांबवा’ असे बॅनर घेऊन विमान मुद्दाम मैदानावरून फिरवले जात होते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) याबाबत लेखी तक्रार केली आहे. आयसीसीने अशा प्रकारच्या प्रचाराला विरोध केला आणि आक्षेपही नोंदवला होता. यॉर्कशायर पोलिसांना आयसीसीने अगोदर सांगूनही अशा प्रकारचा खोडसाळपणा चालूच राहिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

भारत आणि श्रीलंका सामना सुरु असताना जस्टिस फॉर काश्मीर, इंडिया स्टॉप जेनोसाईड अशा आशयाचे अक्षरे घेऊन हे विमान उडत होते. त्यानंतर हेल्प एन्ड मॉब लिंचिंग असा संदेश घेऊन तिसऱ्या हे विमान घिरट्या घालताना दिसले. याबाबत बीसीसीआयने आयसीसीकडे लेखी तक्रार केली आहे. अशा घटना कधीच स्वीकारार्ह नाहीत. उपांत्य फेरीतही असे घडल्यास दुर्दैवी असेल. खेळाडूंच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

​ ​

संबंधित बातम्या