World Cup 2019 : मी आयुष्यभर माफी मागतो, चुकून तो चौकार गेला अन्..!

वृत्तसंस्था
Monday, 15 July 2019

स्टोक्‍स म्हणाला,"मी जाणुनबुजून नक्कीच केले नाही. अपघाताने ते झाले. या झाल्या घटनेबद्दल उर्वरित आयुष्यभर मी न्यूझीलंड चाहत्यांची माफी मागायला तयार आहे. न्यूझीलंड कर्णधार विल्यमसनला देखील आपण तसे म्हणालो.'' ​

वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याला कुठल्या विकेटने किंवा कोणाच्या फलंदाजीने कलाटणी मिळाली नाही. कलाटणी मिळाली ती इंग्लंडला अपघाताने मिळालेल्या षटकाराने. स्टोक्‍सला धावबाद करताना न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने केलेला थ्रो क्रीजकडे झेपावणाऱ्या स्टोक्‍सला बॅटला लागला आमि सीमापार गेला. पंचांनी त्या वेळी इंग्लंडला पळून काढलेल्या दोन आणि ओव्हर थ्रोच्या चार अशा सहा धावा दिल्या आणि येथेच सामन्याला कलाटणी मिळाली.

या क्षणाबद्दल सामन्यानंतर बोलताना स्टोक्‍स म्हणाला,"मी जाणुनबुजून नक्कीच केले नाही. अपघाताने ते झाले. या झाल्या घटनेबद्दल उर्वरित आयुष्यभर मी न्यूझीलंड चाहत्यांची माफी मागायला तयार आहे. न्यूझीलंड कर्णधार विल्यमसनला देखील आपण तसे म्हणालो.'' 

न्यूझीलंड कर्णधार विल्यमसन याने आपल्या स्वभावाप्रमाणे हा प्रसंग खिलाडूवृत्तीने घेतला. तो म्हणाला, "जे घडले ते नक्कीच लाजिरवाणे होते. भविष्यात सामना असा रंगात आणि निर्णायक क्षणात असेल, तेव्हा असे पुन्हा घडू नये इतकेच मी म्हणेन.''


​ ​

संबंधित बातम्या