क्रीडा संघटकावर गुन्हा दाखल
भंडारा - प्रस्तावासोबत खोटे प्रमाणपत्र सादर करून शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळविला. यात शासनाची तसेच सन्मानपूर्वक पुरस्काराचा अपमान केल्याप्रकरणी भंडारा पोलिसांनी क्रीडा संघटक मोहन गोपाळराव दाढी (रा. नरकेसरी वॉर्ड, भंडारा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मोहन दाढी यांनी क्रीडा विभागाकडे पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करताना जिल्हा तलवारबाजी असोसिएशन कार्यकारिणीत असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केले. तसेच जिल्हा महिला असोसिएशनच्या उपाध्यक्षपदाचा खोटा लेटरपॅड तयार करून तोही प्रस्तावाला जोडला. या प्रस्तावाच्या आधारावर 2012-13 चा शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार दाढी यांनी मिळविला होता. त्यांनी व्यक्तिगत फायद्यासाठी पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार राजेंद्र भांडारकर यांनी शासनाकडे केली. मात्र, यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान, त्यांनी भंडारा पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी मोहन दाढी यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सहायक फौजदार चोपकर करीत आहेत.