World Cup 2019 : लॉर्ड्सच्या मैदानात मधूनच 'गणपती बाप्पा मोरया'

सुनंदन लेले
Monday, 15 July 2019

ग्लंड विरुद्ध न्युझिलंड सामान लॉर्डस् मैदानावर चालू असताना बार्मी आर्मी तालासुरात गाणी गात होती. तसेच मधूनच गणपती बाप्पा मोरया आणि भारत माता की जयच्या घोषणा ऐकू येत होत्या.

वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : इंग्लंड विरुद्ध न्युझिलंड सामान लॉर्डस् मैदानावर चालू असताना बार्मी आर्मी तालासुरात गाणी गात होती. तसेच मधूनच गणपती बाप्पा मोरया आणि भारत माता की जयच्या घोषणा ऐकू येत होत्या. त्याला कारण असे होते की भारतीय संघ अंतिम सामन्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतीय चाहत्यांनी तिकिटे विकत घेऊन ठेवली होती. बर्‍याच जणांनी तिकिटे विकून पैसे कमावले तर काहींनी मित्रांना देण्याचा मनाचा मोठेपणा दाखवला. जे खरे क्रिकेट रसिक होते त्यांनी लॉर्डस् मैदानावर येऊन अंतिम सामन्याचा पुरेपूर आनंद घेतला. 

दोन राष्ट्रगीतांची कथा
प्रत्येक सामना चालू होण्याअगोदर सहभागी देशांची राष्ट्रगीते गायला जातात. अंतिम सामन्याअगोदर न्युझिलंड आणि इंग्लंडची राष्ट्रगीते गायली गेली. नंतर त्याची कथा कळाली. जे इंग्लंडचे राष्ट्रगीत आहे ते न्युझिलंडलासुद्धा लागू होते. कारण न्युझिलंड अधिकृतपणे दोन राष्ट्रगीते मंजूर करतो. न्युझिलंडच्या दुसर्‍या राष्ट्रगीतात देशाचे रक्षण करायला देवाला विनंती करताना राष्ट्रभक्तीपण ओसंडून वाहते. इंग्लंडच्या राष्ट्रगीतात गॉड सेव्ह द क्वीन....म्हणजेच फक्त राणीचे गुणगान आहे.


​ ​

संबंधित बातम्या