VIDEO : भारत मदने विरुद्ध विजय गुटाळ कुस्तीत जिंकले कोण ? पाहा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 December 2019

या मैदानातील विजयी मल्ल असे - सागर लाड, प्रताप पाटील, प्रताप माने, प्रदीप माने, सौरभ नांगरे, विशाल बिरंजे, विकास मोरबाळे, ऋग्वेद पाटील, वैभव पाटील, सुशांत गायकवाड, शशिकांत पाटील, सार्थक पाटील, आशिष पाटील, विराज ढेरे, पार्थ निकम, वैष्णवी कुंभार

कोकरुड ( सांगली ) - पणुब्रे वारुण (ता. शिराळा) येथील श्री जोतिर्लिंग यात्रोनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत भारत मदने (पुणे) याने विजय गुटाळ (करमाळा) यास पहिल्या मिनिटातच चितपट करीत उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली. प्रारंभी कुस्ती मैदानाचे पूजन नंदू काका काळे व माजी सभापती हणमंतराव पाटील आणि यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले.

या मैदानात दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत कौतुक डाफळे (पुणे) याने २४ व्या मिनिटाला एकेरी पट डावाने संतोष सुतार (बेनापूर) याला चितपट केले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत सिकंदर शेख (कोल्हापूर) विरुद्ध सुनील शेवतकर (कुर्डुवाडी) बरोबरीत सोडवली. 

अन्य कुस्त्यांचे निकाल असे 

चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत जयदीप गायकवाड (पुणे) याने खेळण्यास नकार दिल्याने जयपाल वाघमोडे (कोल्हापूर) यास विजयी घोषित करण्यात आले. पाचव्या क्रमांकाच्या लढतीत संदीप काशीद (आटपाडी) न आल्याने दत्ता नरळे (कोल्हापूर) यास विजयी घोषित करण्यात आले. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत रामदास पवार (सांगली) हा खेळताना सारखा बाहेर जात असल्याने विकास पाटील (कोल्हापूर) यास विजयी घोषित करण्यात आले. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत स्थानिक मल्ल तात्या इंगळे याने किशोर पाटील (कोल्हापूर) याच्यावर विजय संपादन केला. आठव्या क्रमांकासाठीच्या लढतीत स्थानिक मल्ल निलेश पाटील याने सचिन माने (कुंडल) याच्यावर दुहेरी पट डावाने विजय मिळवला.

हेही वाचा - कुणाला हृदय द्यायचे आहे का ? यांना आहे गरज 

या मैदानातील विजयी मल्ल असे

सागर लाड, प्रताप पाटील, प्रताप माने, प्रदीप माने, सौरभ नांगरे, विशाल बिरंजे, विकास मोरबाळे, ऋग्वेद पाटील, वैभव पाटील, सुशांत गायकवाड, शशिकांत पाटील, सार्थक पाटील, आशिष पाटील, विराज ढेरे, पार्थ निकम, वैष्णवी कुंभार. 

हेही वाचा - शिराळा नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे; यांची बिनविरोध निवड

महिला कुस्तीत मिरजकर, डिस्ले विजयी

महिला कुस्तीत वैष्णवी मिरजकर, संजना डिस्ले यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. पंच म्हणून पांडुरंग पाटील, वसंत सावेकार, आनंदा इंगळे, वसंत बापु पाटील, सर्जेराव पाटील, डी वाय ढेरे यांनी काम पाहिले. मैदानाचे संयोजन उपसरपंच प्रकाश पाटील, अंकुश पाटील,वाय सी पाटील, विजय विभूते, मोहन पाटील, नितिन ढेरे, भिवाजी पाटील यांनी केले.  मैदानात माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख, जि प सदस्य संपतराव देशमुख, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद चव्हाण, ऑलंपिकवीर बंडा पाटील-रेठरेकर, राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, संपत जाधव, बबनराव चिंचोलकर, तानाजी पाटील, बळी राम पाटील, संजय शिरसट, शंकर मोहीते आदी उपस्थित होते.


​ ​

संबंधित बातम्या