Schoolympics 2019 : ब्लॉसम, गुरुकुल प्रशाला संघांची विजयी सलामी
स्कूलिंपिक्स स्पर्धेत फुटबॉल सामन्यात मुलांच्या विभागात ब्लॉसम पब्लिक स्कूल आणि मुलींच्या विभागात सेस गुरुकुल प्रशाला संघांनी एकतर्फी विजय मिळवून विजयी सलामी दिली.
पुणे : स्कूलिंपिक्स स्पर्धेत फुटबॉल सामन्यात मुलांच्या विभागात ब्लॉसम पब्लिक स्कूल आणि मुलींच्या विभागात सेस गुरुकुल प्रशाला संघांनी एकतर्फी विजय मिळवून विजयी सलामी दिली.
Schoolympics 2019 : सकाळ 'स्कूलिंपिक्स' स्पर्धेला उत्साहात सुरवात
एनसीएल मैदानावर झालेल्या सामन्यात ब्लॉसम प्रशाला संघाने आर्यन पाटीलने पूर्वार्धातच 7व्या आणि 17व्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलच्या जोरावर डीईएस सेकंडरी प्रशाला संघाला 2-0 असा पराभव केला.
सीएम इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर झालेल्या सामन्यात मुलींच्या विभागात सेस गुरुकुल प्रशाला संघाने रमा देशमुख आणि जुई दीक्षित यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर गणेश इंटरनॅशनल स्कूलचा 4-0 असा पराभव केला.
निकाल : मुली
सीएम इंटरनॅशनल स्कूल मैदान : मिलेनियम नॅशनल स्कूल (कर्वेनगर) 3 (वैष्णवी बराटे 13, 28वे, सानिका पटवर्धन 22वे मिनिट) वि.वि. डॉ. एरिन नगरवाला डे स्कूल (कल्याणीनगर) 0, सेस गुरुकुल, विद्यापीठ रस्ता 4 (रमा देशमुख 4 वे, जुई दीक्षित 12, 15वे मिनीट) वि.वि. गणेश इंटरनॅशनल स्कूल (चिखली) 0, ब्ल्यू रिज पब्लिक स्कूल (हिंजवडी) 4 (युक्ता पाटील 18वे, पल्लवी मिश्रा 23, 29वे, महेक शहा 28वे मिनीट) वि.वि. पोदार इंटरनॅशनल स्कूल (आंबेगाव) 0, आर्चिड स्कूल (बाणेर) 0, 2 (अनिष्का सचदेव, निशिता कामदार) वि.वि. सिटी इंटरनॅशनल स्कूल (कोथरूड) 0, 1 (अन्विका अगने)
मुले :
आगाशे कॉलेज मैदान : डॉ. एरिन नगरवाला डे, कल्याणीनगर 2 (रितेश कारंडे 17वे, आर्यन राजगुरू 20वे मिनीट) वि.वि. श्री आत्म वल्लभ इंग्लिश स्कूल (येरवडा) 0, एसएसपीएमएस (डे) आरटीओ 1 (कौस्तुभ चौरे 8वे मिनीट) वि.वि. एंजल इंग्लिश माध्यम स्कूल (सीबीएसई), संभाजीनगर 0, विखे पाटील मेमोरियल स्कूल (लोहगाव) 0, 4(भावेश चिंडालिया, सिद्धेश थानगे, दक्ष कांबळे, सर्वेश कुलकर्णी) वि.वि. एंजल प्रशाला (लोणी काळभोर) 0, 3 (आशुतोष नाळे, रोहन बोरकर, साहिल गोटे), लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूल (कल्याणीनगर) 8 (प्रथम शर्मा 3, 34, 37, 40वे, विवान डे 6वे, ओमकार जगताप 14वे, निश्चय भोसले 19वे, आर्य माटे 23वे मिनीट) वि.वि. सी. पी. गोएंका इंटरनॅशनल स्कूल उबाळेनगर, (वाघोली) 0, अग्रसेन प्रशाला (येरवडा) 3 (आयुष धिवार 10, 32, 38वे मिनिीट) वि.वि. अमानोरा स्कूल (हडपसर) 0, सरदार दस्तूर होशांत बॉईज स्कूल (कॅम्प) 4 (आकाश कुद्रे 8, 27, 31, 37वे मिनीट) वि.वि. एंजल प्रशाला (उरळी कांचन) 0
एनसीएल मैदान : विद्याशिल्प पब्लिक स्कूल (कोंढवा) 3 (मुबिन बागवान 3, 12, 31वे मिनीट) वि.वि. कॅलम प्रशाला (उंड्री) 1 (आर्ष मोहंमद 8वे मिनीट), सेंट मॅथ्यूज ऍकॅडमी (उरळी देवाची) 3 (आयुष देशपांडे 22, 24वे, अझलन शेख 38वे मिनीट) वि.वि. व्हर्सटाइल प्रायमरी स्कूल (वडगाव बु.) 2 (सोहम कुबाळ 12वे, चैतन्य पुराणिक 29वे मिनीट), जेएसपीएम ब्लॉसम पब्लिक स्कूल (नऱ्हे) 2 (आर्यन पाटील, 7, 17वे मिनीट) वि.वि. डीईएस सेकंडरी स्कूल (टिळक रस्ता) 0, हिलग्रीन प्रशाला (उंड्री) 1 (ब्रेंडन डीसूझा 23वे मिनीट) 5 (अभिजित रनसारवे, प्रेम झांबरे, सचिन पाठक, भारत परमार, अब्दुला शेख) वि.वि. रिम्स इंटरनॅशनल स्कूल (उंड्री) 1 (सियान शेख 28वे मिनीट) 4 (क्रिशले मिश्रा, रोसेश चौबे, सईम कार्बेलकर, झैद बागवान) निकाल पेनल्टी शूट आऊटमध्ये.