भारताच्या विजयात सलामीत तनिषा क्रॅस्टोची चमक

वृत्तसंस्था
Monday, 30 September 2019

- मैराबा लुवांग आणि तनिषा क्रॅस्टो यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने जागतिक मिश्र सांघिक बॅडमिंटनमध्ये विजयी सुरवात केली

- गोव्याच्या तनिषाने विजयात मोलाची कामगिरी करताना मुलींच्या तसेच मिश्र दुहेरीच्या लढतीत विजय मिळविला

- भारताच्या गटात ऑस्ट्रेलिया, आर्मेनिया, जपानही आहेत. गतवर्षी भारतास उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली होती. 

मुंबई - मैराबा लुवांग आणि तनिषा क्रॅस्टो यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने जागतिक मिश्र सांघिक बॅडमिंटनमध्ये विजयी सुरवात केली. कैझान (रशिया) येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताने सलामीच्या लढतीत अमेरिकेचा 4-1 असा पाडाव केला. 
गोव्याच्या तनिषाने विजयात मोलाची कामगिरी करताना मुलींच्या तसेच मिश्र दुहेरीच्या लढतीत विजय मिळविला. तिने इशान भटनागरच्या साथीत मिश्र दुहेरीची लढत दोन गेममध्येच जिंकली. जागतिक क्रमवारीत दहावा असलेल्या मेराबा याने त्याची लढत 26 मिनिटांत झटपट जिंकली. त्याला यंदा छान सूर गवसला आहे. त्याने रशियातच आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे, त्याचा त्याला या स्पर्धेत फायदा होईल, ही अपेक्षा आहे. 
तासनीन मीर हिने मुलींच्या एकेरीची लढत जिंकत भारताची आघाडी वाढवली. मनजित सिंग-इमान सोनोवालने दुहेरीची लढत गमावली. पण, अदिती भट आणि तनिषाने तीन गेमची मुलींच्या दुहेरीची लढत जिंकत भारताचा विजय साकारला. भारताच्या गटात ऑस्ट्रेलिया, आर्मेनिया, जपानही आहेत. गतवर्षी भारतास उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली होती. 
 


​ ​

संबंधित बातम्या