कॅनडा ओपन बॅडमिंटन : अजय जयराम, लक्ष्य सेनसह सौरभ वर्माची विजयी सलामी

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 3 July 2019

काही महिन्यांपूर्वी जागतिक क्रमवारीत तेरावा असलेल्या अजयने दुसरा गेम जादा गुणांवर गमावला, पण अखेर कॅनडाच्या हुआंग गुओझिंग याला 21-15, 20-22, 21-15 असे हरवत आगेकूच केली. त्याच्या समोर आता इंग्लंडच्या राजीव जोसेफचे आव्हान असेल. 

मुंबई : अजय जयराम, सौरभ वर्मा, तसेच लक्ष्य सेनने कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीत विजय मिळविला. अजयला तीन गेमच्या लढतीस सामोरे जावे लागले, पण सौरभ आणि लक्ष्यने दोन गेममध्येच बाजी मारली. 

काही महिन्यांपूर्वी जागतिक क्रमवारीत तेरावा असलेल्या अजयने दुसरा गेम जादा गुणांवर गमावला, पण अखेर कॅनडाच्या हुआंग गुओझिंग याला 21-15, 20-22, 21-15 असे हरवत आगेकूच केली. त्याच्या समोर आता इंग्लंडच्या राजीव जोसेफचे आव्हान असेल. 

राष्ट्रीय विजेत्या सौरभने सुरवातीच्या संघर्षानंतर खेळ उंचावत कॅनडाच्या अँतोनिओ याला 21-18, 21-13 असे पराजित केले, तर लक्ष्यने इंग्लंडच्या चुन कॅर लुंग याचा 21-7, 21-8 असा फडशा पाडला. आता सौरभसमोर कॅनडाच्याच बी आर संकीर्त, तर लक्ष्यसमोर चीनच्या वेंग हॉंग यांग याचे आव्हान असेल. 

भारताचे प्रमुख आशास्थान असलेल्या एच. एस. प्रणॉय तसेच पारुपली कश्‍यपला या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत बाय होता. सहाव्या मानांकित कश्‍यपसमोर फ्रान्सच्या ल्युकास कॉवी याचे तर तिसऱ्या मानांकित प्रणॉयसमोर जपानच्या कोकी वॅतानाबे याचे आव्हान असेल.

​ ​

संबंधित बातम्या