CPL2020 : सामन्यात पाऊस अन् पावसात तो धावला! (Video)

सुशांत जाधव
Friday, 4 September 2020

पावसाने खेळ थांबवल्यानंतर तळ्याचे स्वरुप आलेल्या ब्रायन लारा स्टेडियमवर एक अनोखा नजारा पाहायला मिळाला. किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्सच्या ताफ्यात असलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बेन डंक भर पावसात पाणी साचलेल्या मैदानातून धावातानाचे चित्र पाहायला मिळाले. तो नेमका उसेन बोल्डच्या खेळाचा नजारा दाखवून देतोय की मायकेल फिलिप्सच्या  असा  प्रश्न पडावा, असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. 

त्रिनिदाद : ब्रायन लारा स्टेडियमवर जमेका तलावाज आणि सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या सेंट किट्सच्या संघाने 5.4 षटकात 46 धावा करत चांगली सुरुवात केली होती. सलामीवीर लुइस (21) आणि क्रिस लीन (23) धावांवर खेळत असताना पावसाला सुरुवात झाल्यामुळे खेळ थांबण्यात आला. पाऊस इतका मोठा होता की सामन्यावर पाणीच पाणी साठल्याचे मिळाले. आणि सामना अखेर रद्द करण्याची नामुष्की ओढवली. दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण देण्यात आला. गुणतालिकेत जमेकाचा संघ चौथ्या स्थानावर असून सेंट किट्सचा संघ तळाला आहे. जमेकाची सेमीफायनलची आस अद्यापही जिवंत आहे.

CPL2020: हेटमायरसह निकोलस-पोलार्ड ठरताहेत लक्षवेधी

पावसाने खेळ थांबवल्यानंतर तळ्याचे स्वरुप आलेल्या ब्रायन लारा स्टेडियमवर एक अनोखा नजारा पाहायला मिळाला. किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्सच्या ताफ्यात असलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बेन डक  भर पावसात पाणी साचलेल्या मैदानातून धावातानाचे चित्र पाहायला मिळाले. आउटफिल्डवर एका बाजूने दुसऱ्या बाजूला आणि पुन्हा परतीचा त्याने धावून केलेला परतीचा प्रवास सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. बेन डकने आपल्या सहकाऱ्यांसोबत धावण्याची पैज लावून फिटनेस दाखवून दिल्यासारखेच त्याच्या हावभाव पाहून वाटते. कॅरेबिनयन लीगच्या ट्विटर अकाउंटवरुन बेन आउटफिल्डवर धावतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.     
 

ब्रायन लारा स्टेडियमवर जमेका तलावाज आणि सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पावसाने खेळ थांबवल्यानंतर तळ्याचे स्वरुप आलेल्या ब्रायन लारा स्टेडियमवर एक अनोखा नजारा पाहायला मिळाला. किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्सच्या ताफ्यात असलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बेन डंक भर पावसात पाणी साचलेल्या मैदानातून धावातानाचे चित्र पाहायला मिळाले. तो नेमका उसेन बोल्डच्या खेळाचा नजारा दाखवून देतोय की मायकेल फिलिप्सच्या  असा  प्रश्न पडावा, असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. 
 


​ ​

संबंधित बातम्या