CPL 2020 : पोलार्ड विरुद्ध सॅमी यांच्या संघात रंगणार फायनल!

सुशांत जाधव
Wednesday, 9 September 2020

सेंट लुसियाने आतापर्यंत एकदाही जेतेपद मिळवलेले नाही.  सर्वाधिकवेळा चॅम्पियन ठरलेल्या पोलार्डच्या नेतृत्वाखालील नाइट रायडर्स विरुद्ध डेरेन सॅमीचा संघ कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचा ठरेल.  

त्रिनिदाद : कॅरेबियन लीगमच्या पहिल्या सेमी फायनलमधील विजयसह सलग 11 विजय नोंदवत त्रिनबागो नाइट रायडर्संने दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केलाय. त्याच्यापाठोपाठ सेंट लुसिया झूक्सने दुसऱ्या सेमी फायनलमध्ये एकतर्फी पराभूत करत फायनल गाठली. आठव्या हंगामात या दोन्ही संघातील कोणता संघ चॅम्पियन ठरणार याचा फैसला गुरुवारी 10 सप्टेंबर  बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

CPL2020 : 6,6,6,6,6.... पोलार्डने केलीय षटकारांची बरसात! 

पहिल्या सेमीफायनलमध्ये नाइट रायडर्सने निर्विवाद वर्स्वव दाखवून दिल्यानंतर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये सेंट लुसियाने गुयाना अमेझॉन वारियर्सला एकतर्फी मात दिली. अमेझॉन वॉरियर्सकडून चंद्रपॉल हेमराज (25), निकोलस पूरन (11) आणि कर्णधार क्रिस ग्रीन (11) वगळता सर्व वॉरियर्संनी सेंट लुसियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. परिणामी संघ 13.4 षटकात 55 धावांत आटोपला. 

सिक्सर किंग पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत 

या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर रहकिम कॉर्नवॉल 17 चेंडूत नाबाद 32 धावा आणि मार्क डेलने 10 चेंडूत झटपट 19 धावांची खेळी करत संघाला अंतिम सामन्याचं तिकीट मिळवून दिले. सेंट लुसियाने आतापर्यंत एकदाही जेतेपद मिळवलेले नाही.  सर्वाधिकवेळा चॅम्पियन ठरलेल्या पोलार्डच्या नेतृत्वाखालील नाइट रायडर्स विरुद्ध डेरेन सॅमीचा संघ कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचा ठरेल.  


​ ​

संबंधित बातम्या