भारतीय खेळाडूंच्या निवडीबद्दल प्रसाद यांचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था
Sunday, 21 July 2019

प्रसाद यांचे बोल 
- ट्‌वेंटी 20 संघातील खेळाडू हळूहळू एकदिवसीय लढतींसाठी तयार होतील 
- खेळाडूंवर पडणारा भार, एखाद्या मालिकेसाठीची गरज लक्षात घेऊन ब्रेकबाबत विचार 
- ट्रेनर, फिझिओ, मार्गदर्शकांच्या मतानुसारच हा निर्णय 
- भारत अ संघातील कामगिरी लक्षात घेऊनच मनीष पांडे, श्रेयस अय्यर, नवदीप सैनीची निवड 

निवड समिती अध्यक्ष विविध खेळाडूंबद्दल 
- केदार जाधव ः संघाबाहेर ठेवण्यासाठी त्याच्याकडून काहीही चुकीचे घडलेले नाही. अर्थात सर्व गोष्टी लक्षात ठेवून आम्ही बॅकअपचा विचार करीत आहोत. 
- पृथ्वी शॉ ः दुखापतीमुळे संघनिवडीसाठी अनुपलब्ध 
- हार्दिक पंड्या ः तो सध्या एका गोष्टीत व्यग्र 
- जसप्रीत बुमरा ः मर्यादित षटकांच्या लढतीच्या वेळी विश्रांती 
- शुभमन गिल ः केएल राहुल अनुपलब्ध असल्याने निवड, राहुलच्या पुनरागमनामुळे गिल संघाबाहेर. अर्थातच त्याचा भविष्याचा विचार 
- अजिंक्‍य रहाणे ः मर्यादित षटकांच्या लढतीसाठी विचार, मात्र अ संघातील खेळाडूंना संधी दिल्याने विचार नाही 
- धवनऐवजी पंतच्या निवडीबद्दल ः धवन जखमी झाला, त्या वेळी राहुलचा पर्याय. संघ व्यवस्थापनास डावखुरा फलंदाज हवा असल्याने पंतला पसंती 
- शंकरऐवजी अगरवालच्या निवडीबद्दल ः विजय शंकर जखमी झाला, त्या वेळी के एल राहुलला झेल घेताना दुखापत झाली असे वाटत होते, त्यामुळे संघ व्यवस्थापनाने सलामीवीराची निवड करण्याचे सुचविले. उपलब्ध सलामीवीरात मयांक योग्य वाटल्याने त्याची निवड 

प्रसाद यांचे बोल 
- ट्‌वेंटी 20 संघातील खेळाडू हळूहळू एकदिवसीय लढतींसाठी तयार होतील 
- खेळाडूंवर पडणारा भार, एखाद्या मालिकेसाठीची गरज लक्षात घेऊन ब्रेकबाबत विचार 
- ट्रेनर, फिझिओ, मार्गदर्शकांच्या मतानुसारच हा निर्णय 
- भारत अ संघातील कामगिरी लक्षात घेऊनच मनीष पांडे, श्रेयस अय्यर, नवदीप सैनीची निवड 
- पुढील विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत खेळू शकतील याच खेळाडूंना जास्त पसंती 
- स्पर्धेदरम्यान संघातील बदली खेळाडूंच्या निवडीची कारणे सांगायला हवी होती, ती चूक

भारतीय संघ 
ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्‍वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी. 

एकदिवसीय मालिकेसाठी ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्‍वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी. 

कसोटी मालिकेसाठी ः विराट कोहली (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे, मयांक अगरवाल, केएल राहुल, चेतेश्‍वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), आर आश्‍विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, जसप्रीत बुमरा, उमेश यादव. 


​ ​

संबंधित बातम्या