सांगलीतील दोघे डाॅक्टर ठरले काॅम्रेड मॅरेथाॅनचे बाजीगर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 June 2019

मिरज - सांगलीतील डाॅ. सचिन उदगावे आणि डाॅ. सुभाष पाटील यांनी दक्षिण आफ्रीकेतील काॅम्रेड मॅरेथाॅन सर केली. ती पुर्ण करणारे दोघेही पहिलेच सांगलीकर ठरले आहेत. काल ( ता. 9 ) दक्षिण आफ्रीकेतील डर्बन येथे 87 किलोमीटर अंतराची शर्यत त्यांनी यशस्वीरीत्या पुर्ण केली. 

डर्बन ते पीटसमझीनबर्ग या दोन शहरांदरम्यान ती होते. समुद्रसपाटीपासून उंचीकडे धावावे लागते. सांगलीतील दंतरोगतज्ञ डाॅ. सचिन उदगावे आणि डाॅ. सुभाष पाटील यांनी प्रथमच भाग घेतला होता. डाॅ. पाटील यांनी 10 तास 56 मिनिटांत मॅरेथाॅन पुर्ण केली. डाॅ. उदगावे यांनी 11 तास 35 मिनिटांचा वेळ घेतला. डाॅ. पाटील यांना प्रशिक्षक अक्रम मुजावर यांनी मार्गदर्शन केले.

अशी आहे काॅम्रेड मॅरेथाॅन
महायुद्धाचा काळ वगळता गेल्या 94 वर्षांपासून काॅम्रेडे मॅरेथाॅन अखंड सुरु आहे. जगभरातील धाडसी धावपटूंत ती प्रचंड लोकप्रिय आहे. सरासरी 22 हजार स्पर्धक दरवर्षी सहभागी होतात. डर्बनमध्ये समुद्रसपाटीपासून सुरु होते, डोंगराळ भागात उंचावर जाऊन संपते. ही चढण सुमारे 5 हजार फूट इतकी आहे. भारतातून यंदा 170 स्पर्धक सहभागी झाले़. सांगलीतून फक्त दोघेच होते. 87 किलोमीटरचे अंतर पुर्ण करण्यासाठी बारा तासांचा वेळ असतो. तिची लोकप्रियता इतकी कि आॅलंपिक स्पर्धेत भाग घेतलेले स्पर्धकही सहभागी होतात. या दोन शहरांदरम्यान अनेक टेकड्या आहेत, त्या पार कराव्या लागतात. प्रत्येक टेकडी पार करण्यासाठी लागलेला वेळ हा स्पर्धेतील यशाचा मानदंड ठरतो.

​ ​

संबंधित बातम्या