Copa America : मेस्सी अन् अर्जेंटिनाचा आणखी एक स्वप्नभंग

शैलेश नागवेकर
Wednesday, 3 July 2019

निवृत्तीनंतर परत आला होता मेस्सी
 गत कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनाचा चिलीविरुद्ध अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटवर पराभव झाला होता, मेस्सीने स्वतः एक पेनल्टी वाया घालावली होती त्यामुळे अश्रू अनावर झालेल्या मेस्सीने देशाकडून निवृत्ती घेतली होती, अखेर त्याची समजूत काढून विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रता स्पर्धेत तो खेळला होता त्यात त्याच्या परिश्रमामुळे अर्जेंटिना विश्वकरंडकासाठी पात्र ठरले.

लिओनेल मेस्सी आधुनिक फुटबॉलचा जादुगर कलात्मक फुटबॉलच्या आपल्या क्षमतेमुळे व्यावसाईक फुटबॉल क्षेत्रात बार्सिलोनाला अनेक विजेतेपद मिळवून दिली आहे स्वतःही सर्वोत्तम फुटबॉलपटूचे अनेक पुरस्कारही मिळवले आहे, पण देशासाठी तो एकही विजेतेपद मिळवून देऊ शकलेला नाही. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत भारतीय वेळेनुसार आज सकाळी झालेल्या लढतीत अर्जेंटिनाचा उपांत्य फेरीत ब्राझीलकडून 0-2 असा पराभव झाला आणि देशाची जर्सी घालून खेळताना मेस्सीचा आणखी एक स्वप्नभंग झाला.
वर्ल्डकप किंवा कोपा अमेरिका स्पर्धा या अमेरिका खंडातील देशातील संघांसाठी प्रतिष्ठेच्या स्पर्धा पण इतके प्रयत्न करूनही मेस्सीला अर्जेंटिनाला अजिंक्य ठरवता आलेले नाही.

निवृत्तीनंतर परत आला होता मेस्सी
 गत कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनाचा चिलीविरुद्ध अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटवर पराभव झाला होता, मेस्सीने स्वतः एक पेनल्टी वाया घालावली होती त्यामुळे अश्रू अनावर झालेल्या मेस्सीने देशाकडून निवृत्ती घेतली होती, अखेर त्याची समजूत काढून विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रता स्पर्धेत तो खेळला होता त्यात त्याच्या परिश्रमामुळे अर्जेंटिना विश्वकरंडकासाठी पात्र ठरले. परंतु तेथेही अर्जेंटिनाचा झेंडा अटकेपार लावण्यास त्याला अपयश आले. एवढेच नव्हे तर अगोदरच्या कोपा स्पर्धेतही चिलीविरुद्ध अर्जेंटिनाची हार झाली होती. 

ब्राझीलविरुद्दच्या आजच्या उपांत्य सामन्यात मेस्सीने गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, परंतु चेंडू गोलजाळण्यात मारण्यात त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना अपयश आले. 2007 च्या कोपा स्पर्धेतील अंतिम सामन्यात हे दोन्ही देश आमने सामने आले होते त्या सामन्यातही ब्राझीलने 3-0 असा विजय मिळवला होता.


​ ​

संबंधित बातम्या