ऑस्ट्रेलियाने निवडले संघ अन् कर्णधार चक्क भारतीय, पाहा कोण?

वृत्तसंस्था
Tuesday, 24 December 2019

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला घोषित केले आहे. गेल्या दशकातील खेळामधील सर्वोत्तम आणि मानाचा खेळाडू असे कौतुक करत कोहलीची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

सिडनी :क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट मधील यंदाच्या दशकातील सर्वोत्तम खेळाडूंचे दोन संघ जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही संघांचे कर्णधार भारतीय आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला घोषित केले आहे. गेल्या दशकातील खेळामधील सर्वोत्तम आणि मानाचा खेळाडू असे कौतुक करत कोहलीची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. मात्र, तो त्याच्या नेहमीच्या क्रमांकावर फलंदाजी करणार नाही. त्याची जागा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने घेतली आहे. 

INDvsWI : स्वत:लाच सिद्ध करुन दाखवायचं होतं की मी वनडे खेळू शकतो

या संघात सलामीवीर म्हणून इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूक आणि ऑस्ट्रेलिचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांची निवड झाली आहे. त्यानंतर विल्यम्सन, स्टिव्ह स्मिथ आणि मग कोहली पाचव्या क्रमांकावर खेळणार आहे. या संघात यष्टीरक्षक म्हणून दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलर्सची निवड करण्यात आली. अष्टपैलू म्हणून इंग्लंडच्या बेन स्टोक्सची निवड करण्यात आली आहे तर गोलंदाज म्हणून डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अॅंडरसन आणि नेथन लायन यांची निवड झाली आहे. 

INDvsSL : आता मला विश्रांती हवीये; भारताच्या 'या' प्रमुख खेळाडूची मागणी

एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कूल म्हणजेच महेंद्रसिंह धोनीची निवड झाली आहे. या संघात सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि हशिम आमला यांची निवड झाली आहे तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळणार आहे. गोलंदाज म्हणून मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, लसिथ मलिंगा आणि राशिद खान यांची निवड झाली आहे. 


​ ​

संबंधित बातम्या