सौरव गांगुलींची धूरा जय शहांच्या खांद्यावर; ICC मध्ये करणार BCCI चे प्रतिनिधीत्व

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) प्रतिनिधीत्व बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह करणार आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) प्रतिनिधीत्व बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह करणार आहेत. बीसीसीआयच्या झालेल्या 89 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा आयसीसीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी जय शाह यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी आयसीसी मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली हे भारताचे प्रतिनिधित्व करत होते. 

सिडनीच्या मैदानात टीम इंडियासोबत घडलेल्या प्रकारावर विराट संतापला

बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना जानेवारी मध्ये हृदय विकाराचा त्रास झाल्यामुळे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. आणि त्यानंतर त्यांच्यावर अँजियोप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. नुकतेच त्यांना हॉस्पिटल मधून डिसचार्ज देण्यात आला आहे. मात्र अजूनही त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आणि त्यामुळे बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांची आयसीसीत भारताचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मंडळाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. 

AUSvsIND : वर्णभेदी टिप्पणीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा माफीनामा 

याशिवाय, यंदाच्या वर्षात होणाऱ्या आयसीसीच्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकप आणि 2023 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेच्या आयोजनासाठी, सरकारकडून करसवलत मिळावी म्हणून सेक्रेटरी जय शाह आणि खजिनदार अरुण धुमाळ बोलणी करणार असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. आणि ही करसवलत मान्य न झाल्यास पुन्हा यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे बीसीसीआयच्या या अधिकाऱ्याने नमूद केले.    

        


​ ​

संबंधित बातम्या