सचिनसोबत खेळलेल्या युसूफ पठाणलाही कोरोनाची लागण

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 27 March 2021

सचिन तेंडुलकर आणि युसूफ पठाण रायपूरमध्ये रंगलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये एकत्र खेळले होते.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar Covid-19 Positive) आढळल्यानंतर आता  युसूफ पठाणचा (Yusuf Pathan Covid-19 Positive) कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ट्विटरच्या माध्यमातून युसूफ पठाणने कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. सचिन तेंडुलकर आणि युसूफ पठाण रायपूरमध्ये रंगलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये एकत्र खेळले होते. सचिनच्या नेतृत्वाखालील इंडिया लिजेंड्स संघाने फायनलमध्ये श्रीलंका लिजेंटड्सला नमवून ट्रॉफी जिंकली होती.  

सचिनला कोरोना; लारा, सेहवाग युवीसह अन्य दिग्गजांवर क्वारंटाईनची वेळ?

युसूफ पठाणने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, , 'कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागल्यानंतर चाचणी केली. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतले आहे, अशी माहिती युसूफ पठाणने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. आवश्यकती खबरदारी घेत असून माझ्या संपर्कात आलेल्याने कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्याने केले आहे.  

युसूफ पठाणने 5 सामन्यातील 4 डावात 69.50 ची सरासरी आणि 171.60 च्या सरासरीने 139 धावा केल्या होत्या. स्पर्धेत सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. युसूफ पठाणच्या बॅटमधून 10 षटकार पाहायला मिळाले होते. युवराज सिंगने स्पर्धेत सर्वाधिक 17 षटकार खेचले होते. 

फलंदाजीसह गोलंदाजीतही युसूफ पठाणने चमकदार कामगिरी केली होती. स्पर्धेत 111 धावा खर्च करुन त्याने 9 विकेट्स घेतल्या होत्या. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. स्पर्धेत सर्वाधिक 12 विकेट श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानने घेतल्या होत्या. पण तो युसूफपेक्षा तीन सामने अधिक खेळला होता. युसूफ पठाणने या स्पर्धेत अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सामनावीराचा बहुमान मिळवला होता. 


​ ​

संबंधित बातम्या