स्पर्धात्मक क्रिकेटसाठी अंकितला मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 June 2021

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामुळे कायमची बंदी घातलेल्या अंकित चव्हाणला त्यातून सूट देण्यात आली आहे. अंकितवरील बंदी गतवर्षी सप्टेंबरमध्ये संपली असल्याचे भारतीय क्रिकेट मंडळाने त्याला कळवले आहे.

मुंबई - आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामुळे कायमची बंदी घातलेल्या अंकित चव्हाणला त्यातून सूट देण्यात आली आहे. अंकितवरील बंदी गतवर्षी सप्टेंबरमध्ये संपली असल्याचे भारतीय क्रिकेट मंडळाने त्याला कळवले आहे. 

‘मी पूर्ण तंदुरुस्त आहे. स्पर्धात्मक क्रिकेटसाठी स्वतःला तयार ठेवले आहे. माझे घर शिवाजी पार्कजवळ आहे. मी अजूनही खेळू शकतो,’ असे अंकितने सांगितले. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी श्रीशांत, अंकित तसेच अजित चंडिला यांच्यावर कायमची बंदी घालण्यात आली होती.


​ ​

संबंधित बातम्या