अन् ऑस्ट्रेलियन दिग्गजानं पाहिलं स्मिथ-कोहली पार्टनरशिपच स्वप्न

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 2 January 2021


ब्रॅड हॉजच्या टेस्ट इलेव्हनमध्ये 3 जलदगती गोलंदाज असून एका फिरकीपटूचा समावेश आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिसला अष्टपैलूच्या रुपात आपल्या ड्रीम संघात खेळवण्याला पसंती दिली आहे.

ऑस्ट्रेलियन संघाचा (Australia Cricket Team) माजी दिग्गज क्रिकेटर ब्रॅड हॉजने (Brad Hogg) दशकातील सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. त्याने आपल्या संघात केवळ एकाच भारतीयाला स्थान दिले आहे. ऑस्ट्रेलियन दिग्गजाने निवडलेल्या दशकातील बेस्ट कसोटी प्लेइंग इलेव्हनध्ये ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका या संघातील प्रत्येकी 3-3 खेळाडू आहेत. भारतासह पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या संघातील केवळ एका खेळाडूला त्याने आपल्या संघात घेतले असून इंग्लंडच्या दोन खेळाडूंना त्याने पसंती दिली आहे. 

ब्रॅड हॉजच्या टेस्ट इलेव्हनमध्ये 3 जलदगती गोलंदाज असून एका फिरकीपटूचा समावेश आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिसला अष्टपैलूच्या रुपात आपल्या ड्रीम संघात खेळवण्याला पसंती दिली आहे. विकेटमागची धूरा त्याने दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सकडे सोपवली आहे.  

उपकर्णधार रोहित शर्मा आगामी सामन्यासाठी सज्ज; केला नेटमध्ये कसून सराव

ब्रॅड हॉजच्या दशकातील सर्वोत्तम संघात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. चौथ्या क्रमांकावर विराटसारखा आक्रमक खेळाडू उपयुक्त ठरेल, असे हॉजला वाटते. विराट कोहली एकटा सामन्याला कलाटणी देऊ शकतो, असेही त्याने म्हटले आहे. पाचव्या क्रमांकावर त्याने आपल्याच देशाच्या स्टीव्ह स्मिथची निवड केली आहे. कोहली आणि स्मिथची जोडी जमली तर धावफलक हलता राहिलच शिवाय क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणी ठरेल, अशी कल्पनाही हॉजने केली आहे.  ब्रॅड हॉजने केन विल्ययमसन आणि एलिस्टर कूक या दिग्गजांनाही आपल्या संघात स्थान दिले आहे. याशिवाय जेम्स अँडरसन, पॅट कमिंस आणि डेल स्टेन या जलदगती गोलंदाजांचा समावेश आपल्या संघात केला आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या