आयपीएलमधील महागडे खेळाडू पहिल्या टी-20 मध्ये फेल

शैलेश नागवेकर
Tuesday, 23 February 2021

कायले जेमिसनला 15 कोटींचा भाव मिळाला; परंतु या सामन्यात त्याच्या 3 षटकांत 32 धावा फटकावण्यात आल्या; तर ग्लेन मॅक्‍सवेलला जेमतेम भोपळा फोडता आला. आयपीएलमध्ये मॅक्‍सवेलला 14 कोटी 25 हजारांची बोली लागलेली आहे.

वेलिंग्टन :  काही दिवसांपूर्वीच झालेल्या आयपीएल लिलावात मोठा भाव मिळालेला न्यूझीलंडचा कायले जेमिसन आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्‍सवेल दोघेही अपयशी ठरले; परंतु न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला ट्‌वेन्टी-20 सामना सहज जिंकला. 

कायले जेमिसनला 15 कोटींचा भाव मिळाला; परंतु या सामन्यात त्याच्या 3 षटकांत 32 धावा फटकावण्यात आल्या; तर ग्लेन मॅक्‍सवेलला जेमतेम भोपळा फोडता आला. आयपीएलमध्ये मॅक्‍सवेलला 14 कोटी 25 हजारांची बोली लागलेली आहे.

पाच सामन्यांच्या मालिकेतील या पहिल्या सामन्यात 3 बाद 19 अशा अवस्थेनंतरही न्यूझीलंडने 5 बाद 184 पर्यंत मजल मारली. डेव्हन कॉन्वे याने 59 चेंडूत नाबाद 99 धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 131 धावांत बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेड, ॲरॉन फिन्च, ग्लेन मॅक्‍सवेल, मार्कस स्टॉयनिस हे प्रमुख फलंदाज एकेरी धावात बाद झाले. 

संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 20 षटकांत 5 बाद 184 (डेव्हन कॉन्वे नाबाद 99 -59 चेंडू, 10 चौकार, 3 षटकार, ग्लेन फिलिप्स 30 -20 चेंडू, 3 षटकार, जिमी नीशाम 26-15 चेंडू, 3 चौकार, डॅनियल सॅम्स 40-2, झाय रिचर्डसन 31-2) वि. वि. ऑस्ट्रेलिया  17.3 षटकांत सर्वबाद 131 (वेड 12, फिन्च 1, मिशेल मार्श 45 -33 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार, मॅक्‍सवेल 1, स्टॉयनिस 8, टीम साऊदी 10-2, टेंट्र बोल्ट 22-2, इश सोधी 28-4)

भारत भारत भारत भारत 
 


​ ​

संबंधित बातम्या