विराट, रोहित, बुमराहला वर्षाला सात कोटी रुपये; हार्दिक, पंत पाच कोटींचे मानकरी

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 16 April 2021

बीसीसीआयच्या वार्षिक करारात २८ खेळाडूंचा समावेश

बीसीसीआयनं वार्षिक मानधन करार जाहीर केला असून विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना अ + श्रेणीतील स्थान कायम ठेवलं आहे. अ + श्रेणीमध्ये फक्त तीन खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. या करारानुसार तिघांना वर्षाला सात कोटी रुपयांचं मानधन दिलं जाणार आहे. गुरुवारी रात्री बीसीसीआयमं २८ खेळाडूंचा या श्रेणीनुसार मानधन करारात स्थान दिलं आहे. 

गेल्या काही महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी आणि टी-२० मालिकेत खेळलेल्या बहुतेक सर्व खेळाडूंना विविध श्रेणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून बेंचवर असणाऱ्या कुलदीप यादवला क श्रेणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. तर खराब कामगिरी करणाऱ्या चहलचीही घसरण झाली आहे.

बीसीसीआयच्या अ +, अ, ब आणि क अशा चार श्रेणीमध्ये तब्बल २८ खेळांडूचा समावेश करण्यात आला आहे. युवा शुबमन गिल यालाही क श्रेणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. अ + श्रेणीमधील खेळाडूंना प्रत्येकी सात कोटी, अ श्रेणीमध्ये असणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी पाच कोटी, ब श्रेणीमध्ये असणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी तीन कोटी तर क श्रेणीतील प्रत्येक खेळाडूला एक कोटी रुपये दिले जातात.... 

पाहूयात कोणत्या श्रेणींमध्ये कोणत्या खेळाडूला स्थान देण्यात आलं आहे.

अ +
विराट कोहली आर. अश्विन वृद्धीमान साहा कुलदीप यादव
रोहित शर्मा रविंद्र जाडेजा भुवनेश्वर कुमार नवदीप सैनी
जसप्रीत बुमराह चेतेश्वर पुजारा उमेश यादव मोहम्मद सिराज
  अजिंक्य रहाणे शार्दुल ठाकूर यजुवेंद्र चहल
  शिखर धवन मयांक अग्रवाल शुबमन गिल
  के.एल. राहुल   हनुमा विहारी
  मोहम्मद शामी   वॉशिंगटन सुंदर
  हार्दिक पांड्या   अक्षर पटेल 
  इशांत शर्मा   श्रेअस अय्यर
  ऋषभ पंत   दीपक चहर

 


​ ​

संबंधित बातम्या