सय्यद मुश्ताकअली टी20 : बीसीसीआयचा युवराज सिंगला ठेंगा

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 31 December 2020

भारतीय क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती स्विकारल्यानंतर यावर्षी त्याने पुन्हा स्थानिक क्रिकेट मधून मैदानात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र यासाठी त्याला भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) परवानगी नाकारली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती स्विकारल्यानंतर यावर्षी त्याने पुन्हा स्थानिक क्रिकेट मधून मैदानात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र यासाठी त्याला भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) परवानगी नाकारली आहे. क्रिकेट बोर्डाच्या नियमानुसार पंजाब संघात सामील झालेल्या युवराज सिंगला स्थानिक क्रिकेट स्पर्धेत भाग घेण्यास मंडळाने नकार दिला आहे. बीसीसीआयने दिलेल्या या निर्णयानंतर युवराज सिंगने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी, बीसीसीआयने युवराजला खेळण्याची परवानगी द्यावी असे म्हटले आहे. 

AUSvsIND : कांगारूंनो सावधान; हिटमॅनचे इंजिन सुरु झाले आहे 

योगराज सिंग यांनी, मंडळाने युवराजला खेळण्याची परवानगी दिली तर त्याचा युवा खेळाडूंना फायदा होणार असल्याचे सांगितले आहे. परंतु हा संपूर्णपणे बीसीसीआयचा निर्णय आहे. तर सेवानिवृत्त खेळाडूंना पुनरागमन आणि युवा खेळाडूंसोबत खेळण्यासाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे असल्याचे मत युवराजचे वडील योगराज सिंग यांनी व्यक्त केले आहे. याव्यतिरिक्त अनुभवी खेळाडूंकडे नवख्या खेळाडूंना देण्यासाठी बरेच काही आहे. व त्याचा युवा खेळाडूंना उपयोग होणार असल्याचे योगराज सिंग यांनी सांगितले.    

दरम्यान, बीसीसीआयच्या नियमानुसार कोणत्याही भारतीय खेळाडूने परदेशातील लीग मध्ये सहभाग घेतला असेल तर त्या खेळाडूला पुन्हा भारतीय क्रिकेट मध्ये परतता येत नाही. तसेच या नियमानुसार त्या क्रिकेटपटूला स्थानिक क्रिकेटसह इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मध्ये देखील खेळता अथवा सहभागी होता येत नाही. 

ICC Test Ranking : पॅटर्निटी लिव्हवरुन परतलेल्या केन विल्यमसला मिळाली गूड...

दरम्यान, सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेन्टी क्रिकेटच्या माध्यमातून भारतातील स्थानिक क्रिकेट लवकरच चालू होणार आहे. आणि या स्पर्धेसाठी पंजाबच्या संघाने तीस खेळाडूंची यादी जाहीर करताना, या यादीत युवराज सिंगचा देखील समावेश केला होता. युवराज सिंगने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. परंतु त्यानंतर पंजाब क्रिकेट असोसिएशनने (पीसीए) त्याला आपल्या घरच्या संघाकडून खेळण्याची विनंती केली होती. आणि त्याने यास सहमती दर्शविली होती. 


​ ​

संबंधित बातम्या