BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुलींची तब्येत बिघडली, जीममधून नेलं रुग्णालयात

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 2 January 2021

त्यांना उपचारासाठी वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जीममध्ये व्यायाम करताना त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हवण्यात आल्याचे समजते.

कोलकाता: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यामान अध्यक्ष सौरव गांगुली यांची तब्येत अचानक बिघडली आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांना उपचारासाठी कोलकाता येथील वूडलँड्स हॉस्पीटलमध्ये दाखल केल्याचे समजते.  त्यांना उपचारासाठी वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जीममध्ये व्यायाम करताना त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हवण्यात आल्याचे समजते.

रुग्णालयातील सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार,  सौरव गांगुली यांच्यावर एंजियोप्लास्टी करण्याची आवश्यकता असल्याचे समजते. 48 वर्षीय गांगुली यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्याच्या स्थितीला त्यांची प्रकृती स्थिर असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. शनिवार सकाळी जीममध्ये वर्कआउट करत असताना सौरव गांगुली यांना त्रास जाणवला. रुग्णालय प्रशासनाने जारी केलेल्या निवदेनात एंजियोप्लास्टीसाठी तपासणी सुरु असल्याचे म्हटले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या