बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना हॉस्पिटल मधून डिसचार्ज 

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 7 January 2021

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांना हॉस्पिटल मधून डिसचार्ज देण्यात आला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांना हॉस्पिटल मधून डिसचार्ज देण्यात आला आहे. सौरव गांगुली यांना काही दिवसांपूर्वी मायनर हार्ट अटॅकचा त्रास झाला होता. आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. आज सौरव गांगुली यांना डॉक्टरांनी डिसचार्ज दिला असून, गांगुली यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. 

AusvsInd "क्रिकेटच्या प्रेमात कोरोनाच्या जाळ्यात अडकायचे नाही"

सौरव गांगुली यांना हार्ट अटॅकचा लहान झटका आल्यानंतर त्यांना कोलकाता मधील वुडलँड्स हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली यांनी आपल्या चाहत्यांसमोर येत, हॉस्पिटल आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले. याशिवाय आता आपण पूर्णपणे ठीकठाक असल्याचे देखील सौरव गांगुली यांनी यावेळेस सांगितले. तसेच सौरव गांगुली यांनी हॉस्पिटल मधून बाहेर पडल्यानंतर चाहत्यांना हात वर करत अभिवादन केले. 

AusvsInd : सिडनीच्या मैदानात आतापर्यंत कोण ठरलंय भारी; जाणून घ्या रेकॉर्ड

दरम्यान, सौरव गांगुली यांना काही दिवसांपूर्वी त्रास झाल्यानंतर त्यांच्यावर अँजियोप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. व त्यानंतर डॉक्टरांचे एक पथक नजर ठेवून होते. सौरव गांगुली यांच्या हृदयाला रक्त पुरवठा करण्यात येणारी रक्तवाहिनी ब्लॉक झाल्यामुळे त्यांच्यावर अँजियोप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे हॉस्पिटल कडून सांगण्यात आले होते.          


​ ​

संबंधित बातम्या